Goa Drug Case: गोव्यात 9 महिन्यात साडे सहा कोटींचे अमली पदार्थ जप्त, 116 जणांना अटक

Goa Drug Case: पोलिसांनी या कारवाईत गांजा, चरस, कोकेन, एलएसडी, एक्टसी गोळ्या, एमडीएमए आणि हिरोईन यासारखे अमली पदार्थ जप्त केले आहेत.
Goa Drug Case: गोव्यात 9 महिन्यात साडे सहा कोटींचे अमली पदार्थ जप्त, 116 जणांना अटक
Goa Drug CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Drug Case

पणजी: गोवा पोलिसांनी गेल्या नऊ महिन्यात साडे सहा कोटी किंमतीचे १६२ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी ११६ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी दिली. राज्यात आगामी पर्यटन हंगाम विचारात घेता ड्रग पेडलर विरोधात कारवाई सुरुच राहिल, असे आलोक कुमार म्हणाले.

उपलब्ध माहितीनुसार, गोवा पोलिसांनी गेल्यावर्षी याच कालावधीत चार कोटी रुपयांचे १७५ किलो अमली पदार्थ जप्त केले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१९ पासून राज्यात अमली पदार्थाबाबत ८५८ प्रकरणं नोंदविण्यात आली असून, १,२७८ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये परदेशी नागरिक, गोमन्तकीय, बिगर गोमन्तकीयांचा समावेश आहे.

पोलिसांनी या कारवाईत गांजा, चरस, कोकेन, एलएसडी, एक्टसी गोळ्या, एमडीएमए आणि हिरोईन यासारखे अमली पदार्थ जप्त केले आहेत.

गोव्याच्या पर्यटन हंगामास सुरुवात झाली असून, परदेशी पर्यटक राज्यात येण्यास सुरुवात झालीय. यापार्श्वभूमीवर ड्रग पेडलर सक्रिय होण्याची भीती असते.

Goa Drug Case: गोव्यात 9 महिन्यात साडे सहा कोटींचे अमली पदार्थ जप्त, 116 जणांना अटक
Goa News: बाळाचा मृत्यू सहन नाही झाला, बापाने GMC तच सातव्या मजल्यावरुन केला उडी घेण्याचा प्रयत्न

पर्यटन हंगामास सुरुवात होताच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन राज्यातील ड्रग माफियांना आळा घालण्यासाठी ठोस धोरण आखण्याची सूचना केली. पोलिसांनी देखील पेडलर्सची यादी तयार करुन सर्व पोलिस स्थानकांत वितरीत केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार पोलिसांची अमली पदार्थाची विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांवर करडी नजर असणार आहे. कारवाईत अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com