Garbage Dainik Gomantak
गोवा

Waste Project Issue: वैद्यनगर येथे कचरा प्रकल्प नको

Waste Project: स्थानिकांचा विरोध नागरिकांची पंचायतीवर धडक

दैनिक गोमन्तक

Waste Project: बेतोडा निरंकाल कोनशे कोडार पंचायत क्षेत्रातील वैद्यनगर येथे कचरा प्रकल्प उभारण्यात येत असून या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. आज वैद्यनगर भागातील नागरिकांनी पंचायतीवर धडक देत सरपंचाकडे आपला विरोध दर्शवला.

सरपंच मधू खांडेपारकर व ग्रामस्थांची यावेळी चर्चा झाली. पंचायत बैठकीत यासंबंधी विषय मांडणार असल्याचे सरपंचांनी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना सांगितले.

बेतोडा पंचायतीजवळ यापूर्वी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी कचरा प्रकल्प उभारण्याचे निश्‍तिच झाले होते. मात्र, त्यावेळेला स्थानिकांनी पंचायतीजवळ कचरा प्रकल्प उभारल्यास पंचायतीत कामासाठी येणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होणार असल्याचे सांगून आपला विरोध दर्शवला. त्यानंतर हा कचरा प्रकल्प वैद्यनगर भागात हलवण्यात आला.

सद्यस्थितीत या कचरा प्रकल्पाचे ऐंशी टक्के काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या कचरा प्रकल्पाला विरोध करणारे निवेदन पंचायतीला देण्यात आले होते, पण कचरा प्रकल्प पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर असल्याने या निवेदनाकडे पंचायतीने तेवढेसे लक्ष दिले नाही,

पण आता हा प्रकल्प पूर्णत्वास येत असून त्यानंतर या ठिकाणी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया होणार असल्याने त्याचा त्रास स्थानिकांना होणार आहे, त्यामुळेच आज स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी पंचायतीला धडक दिली.

यावेळी सरपंच मधू खांडेपारकर, स्थानिक पंच सदस्य दुर्गाप्रसाद वैद्य तसेच उपसरपंच चित्रा सालेलकर उपस्थित होत्या. निवेदन उशिरा आल्यामुळे कार्यवाही होणे कठीण असल्याने आता हा विषय पंचायत बैठकीत मांडण्याचे पंचायतीने ठरवले असल्याचे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT