Captain viriato Fernandes on Dabolim Airport Taxi Counter Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport Taxi Counter: दाबोळी विमानतळावर स्थानिक टॅक्सीचलाकांना डावलले; दिल्ली-बिहारमधून आणले 120 चालक

कॅप्टन व्हिरिएतो फर्नांडिस यांचा आरोप; काऊंटरवरून वगळल्या स्थानिकांच्या टॅक्सी

Akshay Nirmale

Dabolim Airport Taxi Counter: दाबोळी विमानतळावरील ताज टॅक्सी काऊंटरवर स्थानिकांच्या 100 टॅक्सी वगळल्या गेल्या आहेत. या ठिकाणी दिल्ली, बिहारचे 120 टॅक्सीचालक आणले आहेत, असा आरोप कॅप्टन व्हिरिएतो फर्नांडिस (Captain viriato Fernandes) यांनी केला आहे. ताज टॅक्सीच्या मालकांनी हे सर्व केले आहे.

हे टॅक्सीचालक बॅचशिवाय टॅक्सी चालवतात. याशिवाय इतर राज्यातून 60 टॅक्सीज आणल्या गेल्या आहेत. या टॅक्सींची नोंदणी गोव्यात केली गेली आहे. वाहतूक मंत्र्यांना दर तीन महिन्यांनी ताज टॅक्सी काऊंटरच्या मालकाकडून बॅग मिळते, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

परराज्यातील टॅक्सीचालकांची सोय लावण्यात कुणाचा स्वार्थ लपला आहे? हे समोर आले पाहिजे. यामुळे स्थानिक टॅक्सीचालकांचे नुकसान होत आहे. हा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याची गरज आहे. स्थानिक टॅक्सीचालकांना न्याय दिला गेला पाहिजे, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT