Goa Mining Dainik Gomantak
गोवा

Paira Mayem Mining: "स्थानिकांना खाणीवर काम द्या"! संतप्त लोकांनी पैरात खनिज वाहतूक रोखली; ट्रकांवरून बाचाबाची Watch Video

Goa Mining: कंपनीच्या गाव विरोधी धोरणामुळे स्थानिक लोक आता संघटित झाले आहेत. सोमवारी अचानक लोकांनी पैरा येथील जंक्शनवर साळगावकर कंपनीच्या पाण्याच्या टँकरसह खनिज वाहतूक रोखून धरली.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: ट्रकांसह स्थानिकांना खाणीवर काम द्या, अशी मागणी करीत पैरातील संतप्त लोकांनी सोमवारी साळगावकर कंपनीची खनिज वाहतूक रोखली. मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत लढा चालूच राहणार, असा निर्धारही ट्रकवाल्यांसह स्थानिक लोकांनी केला आहे.

शिरगाव-पैरा खाण ब्लॉक अंतर्गत येणाऱ्या साळगावकर कंपनीची (पूर्वाश्रमीची चौगुले) पैरा येथील खाण सुरु झाली आहे. मात्र काम देण्याबाबतीत काही स्थानिक ट्रकांना कंपनीकडून डावलण्यात येत आहे. रोजगाराबाबतीतही स्थानिकांवर अन्याय करण्यात येत आहे, असा स्थानिक लोकांची कैफियत आहे.

कंपनीच्या या गाव विरोधी धोरणामुळे स्थानिक लोक आता संघटित झाले आहेत. सोमवारी अचानक लोकांनी पैरा येथील जंक्शनवर साळगावकर कंपनीच्या पाण्याच्या टँकरसह खनिज वाहतूक रोखून धरली. यावेळी ट्रकांच्या विषयावरून शिरगाव ट्रकमालक संघटना आणि स्थानिकांमध्ये किरकोळ बाचाबाचीही झाली.

आम्ही धूळ आणि अन्य प्रदूषण सहन करीत आहोत. मात्र रोजगाराबाबतीत आमच्यावर अन्याय होत असेल, तर गावात मायनिंग काय कामाचे, असा प्रश्न स्मित घाटवळ व इतर स्थानिकांनी उपस्थित करून आमच्यावर अन्याय होत असेल तर आम्हाला मायनिंग नकोच, अशी भूमिका स्पष्ट केली.

धूळ आम्ही खावी, अन्...!

ट्रकांना काम द्या, अशी कंपनीकडे मागणी केली तर कंपनी शिरगाव ट्रकमालक संघटनेकडे बोट दाखवते. खाण व्यवसायामुळे होणारी धूळ खातानाच अन्य प्रदूषणाच्या संकटाचा सामना स्थानिक लोकांना करावा लागतो, मात्र काम देण्याबाबतीत अडवणूक होते. हा स्थानिकांवर अन्याय आहे, असे ट्रकमालक तथा माजी सरपंच विजय पोळे यांनी सांगितले. स्थानिक ट्रकांना काम द्यावे की नाही, ते ठरविण्याचा अधिकार ट्रकमालक संघटनेला कोणी दिला, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ट्रकांसह स्थानिकांना खाणीवर काम द्या, गावात वैद्यकीय सेवा उपलब्ध करा, अशा मागण्याही त्यांनी केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 5th T20: भारत-वेस्ट इंडिजमध्ये मालिकेसाठी आरपारची लढाई! पाचव्या टी-20 साठी प्लेइंग-11 मध्ये कोणाला मिळणार संधी, कोणाचा पत्ता कट होणार?

Tarun Tejpal Case: तेजपालच्या याचिकांवरील सुनावणी 3 नोव्हेंबरला; जन्मठेपेच्या मागणीवरही लक्ष

Goa Water Conservation: उधळपट्टी टाळू, उद्यासाठी पाणी वाचवू! गोव्याच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा

संघातून बाहेर काढलं, तरी हार मानली नाही! जिद्द, मेहनतीच्या जोरावर जॅक कॅलिस बनला क्रिकेटविश्वातील महान अष्टपैलू; ठोकल्या 25,000हून अधिक धावा, घेतल्या 577 विकेट्स

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

SCROLL FOR NEXT