

डिचोली: धूळ आणि ध्वनी प्रदूषणाचे कारण पुढे करून सारमानस - पिळगाव येथील लोक अचानक रस्त्यावर उतरले. स्थानिक जमावाने सायंकाळी सारमानस येथे सेझा कंपनीच्या गेटजवळ खनिज वाहतूक अडविली. सुमारे तासभर हे आंदोलन चालले. अखेर बराचवेळ चर्चा करून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्या स्थानिकांची समजूत काढण्यात यश मिळवले.
स्थानिकांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलन निवळले. मात्र, तोपर्यंत काळोख पडल्याने रोखलेले ट्रक माघारी फिरले. दरम्यान, खाणीशी संबंधितांच्या हितास कंपनी प्राधान्य देत असून सामाजिक बांधिलकी जपत आहे, असे वेदांताने स्पष्ट केले.
पिळगावच्या सरपंच शर्मिला वालावलकर व उपसरपंच उमाकांत प्रभुगावकर यांनी आंदोलनस्थळी येऊन स्थानिकांची समस्या कंपनी अधिकाऱ्यांसमोर मांडली. तेव्हा पोलिसही तिथे दाखल झाले होते. सारमानस येथे खनिज वाहतुकीमुळे लोकांना धुळीचा सामना करावा लागतो. धडधडीमुळे झोप लागत नाही, अशी खंत माजी सरपंच महेश वळवईकर यांनी व्यक्त केली.
प्रस्थापित प्रक्रियेनुसार वेदांत सेसा गोवा कंपनी कोडली खाणीत प्राथमिक तयारीचे काम करत आहे. सर्व संबंधितांशी संवादातून काढला जाईल.
-वेदांत सेसा गोवा, प्रवक्ते
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.