Baina Beach

 

Dainik gomantak

गोवा

बायणा किनाऱ्यावर स्थानिक मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

दुर्लक्ष झाल्यास त्याचा परिणाम पर्यावरण, सागरी मत्स्यसंपती व लोकांच्या आरोग्यावर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे

दैनिक गोमन्तक

येथील बायणा किनाऱ्यावर वाहत येणारे सांडपाणी समुद्रात मिसळू लागल्याने किनाऱ्यावर दुर्गंधी पसरू लागली आहे. हे सांडपाणी जवळच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून सोडण्यात येत असल्याचा दावा स्थानिक रहिवाशी करत आहेत. हे सांडपाणी आमच्या प्रकल्पातील नसल्याचा प्रतिदावा संबंधितांकडून करण्यात येत आहे.

मात्र, हे सांडपाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने सांडपाण्याचा स्त्रोत संबंधितांनी शोधण्याची गरज व्यक्त केली आहे. याप्रकरणी योग्य वेळी योग्य पाऊले उचलण्यात आली नाही तर बायणा किनारा दुर्गंधीच्या गर्तेत जाण्याची भीती स्थानिक व्यक्त करत आहेत.

बायणा किनाऱ्याच्या (Beach) एका टोकाला मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प आहे. या प्रकल्पात सांडपाण्या वर प्रक्रिया करून ते शुध्द करण्याची यत्रंणा बसवण्यात आली आहे. प्रक्रिया करण्यात आलेले सांडपाणी बागबगीचा व इतर गोष्टींसाठी करण्याचा विचार होता. परंतू संबंधितांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

त्यामुळे हे सांडपाणी समुद्रात दूरवर सोडण्यात येते असा दावा करण्यात येतो. मात्र बायणा किनाऱ्यावरून समुद्राला मिळणाऱ्या नाल्याच्या पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. हे पाणी समुद्रात मिसळत असल्याने किनाऱ्यापासून काही अंतरावर दुर्गंधी पसरू लागली आहे. त्यामुळे सांडपाण्याचा प्रश्न चर्चेत आला आहे.

हे नाल्यामध्ये प्रकल्पातील सांडपाणी प्रक्रिया न करता सोडण्यात येते असा दावा स्थानिक करत आहेत. याप्रकरणी संबंधितांना लक्ष घालण्याची विनंती त्यांनी केली. या दुर्गंधीचा आमच्या आरोग्यावर (Health) परिणाम होत असल्याचे काहीजणांनी सांगितले. नाल्यातील सांडपाणी ज्या ठिकाणी समुद्राच्या पाण्यात मिसळत आहे. त्याठिकाणी लहान मुले त्या पाण्यात खेळतात. काहीवेळा आंधोळ करतात. मासे (Fish) पकडण्याचा प्रयत्न करतात. नाल्याच्या पाण्यामध्ये म्हशीही बसलेल्या दिसतात.

मात्र हे सांडपाणी प्रकल्पातील नसल्याचा दावा प्रकल्पातील (Project) कामगार करतात. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात ते सांडपाणी कोठून येते याचा शोध आरोग्य खाते, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या भू गटार विभागाच्या अधिकारी वर्गाने घेण्याची गरज आहे. बायणातील मलनिस्सारण प्रकल्प सध्या मलनिस्सारण व साधनसुविधा विकास महामंडळातर्फे (Corporation) चालविण्यात येतो. त्यामुळे संबंधितांनी यासंबंधी स्पष्टीकरण करून रहिवाशांच्या मनातील भीती दूर करण्याची गरज आहे. याप्रकरणी दुर्लक्ष झाल्यास त्याचा परिणाम पर्यावरण, (environment) सागरी मत्स्यसंपती व लोकांच्या आरोग्यावर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT