Goa University LLB  Dainik Gomantak
गोवा

LLB Admission Scam : ‘कारे’च्या प्राचार्यांनी स्वतःच बदलली गुणपद्धत

विद्यापीठ चौकशी समितीचा अहवाल आज तयार

दैनिक गोमन्तक

LLB Admission Scam : विधी महाविद्यालयातील एलएलबी प्रवेश परीक्षेतील घोळ प्रकरणात एक परीक्षार्थी तक्रार नोंदविण्यास पुढे आल्याने विद्यापीठाच्या चौकशी समितीला आज या प्रकरणाची अधिक गांभीर्याने दखल घ्यावी लागली.

पणजीच्या साळगावकर विधी महाविद्यालयात प्रवेश परीक्षा दिलेल्या एका विद्यार्थिनीने यासंदर्भात नवीन पद्धतीमुळे आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागल्याची तक्रार नोंदविली आहे. प्रवेश नियमात स्पष्ट केल्यानुसार आपण परीक्षेला बसले असले तरी प्रत्यक्षात गुणांची बेरीज करताना आपल्यावर अन्याय होण्याची भीती तिने व्यक्त केली आहे.

एलएलबी प्रवेश परीक्षेतील प्रचलित नियमानुसार 12वीच्या परीक्षेतील गुण व प्रवेश परीक्षा यामधील गुणांची समान बेरीज गृहीत धरण्यात येत असता, अचानक यावर्षी 12वीच्या परीक्षेतील गुण विचारात न घेण्याचा निर्णय कारे विधी महाविद्यालयाने घेतला. यावर्षी परीक्षा घेण्याची जबाबदारी कारे विधी महाविद्यालयाकडे सोपविण्यात आली होती.

दरम्यान, आज कारे आणि साळगावकर विधी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना चौकशी समितीला सामोरे जावे लागले.

कुलगुरूंच्या सूचनेला हरताळ

कुलगुरूंनी कारे महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पद्धत बदलण्यापूर्वी परीक्षा नियम व्यवस्थित बदलून घेण्याची सूचना केली होती.

आजच्या सुनावणीत प्राचार्यांनी स्वतःच्या मर्जीने व साळगावकर महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी सल्लामसलत न करता प्रवेश परीक्षा पद्धत बदलली, हे सत्य उघडकीस आले, अशी माहिती उपलब्ध झाली. विद्यापीठाची समिती गुरुवारी आपला अहवाल सादर करणार आहे.

...अन् कुलगुरूही संतापले

आतापर्यंतच्या चौकशीमध्ये ज्या पद्धतीने प्रवेश परीक्षा घेतली, त्याबद्दल समिती फारशी खुश नाही. अचानक बदललेल्या पद्धतीमुळे विद्यार्थांचा खेळखंडोबा झाला. अशी परीक्षा पद्धत बदलण्याचा हेतू केवळ आपल्या पुत्रावर मेहेरनजर करण्याचा होता.

मुख्य मुद्दा कारे महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी गोवा विद्यापीठाची रितसर मान्यता घेतली होती का, हा असून विद्यापीठाने तशी कोणतीही मान्यता दिली नव्हती, हे सत्य सामोरे आले आहे. प्राचार्यांनी आपण यासंबंधीची मान्यता घेतली होती, असे जाहीर केले होते. त्यामुळे कुलगुरू चिडले असल्याची माहिती उपलब्ध झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT