Goa University postponed the offline examination by three weeks
Goa University postponed the offline examination by three weeksDainik Gomantak

Goa University:..त्यामुळे गोवा विद्यापीठाने परीक्षा तीन आठवड्यांनी पुढे ढकलल्या

कोविडच्या बिकट परिस्थितीमुळे 14 जानेवारीपासून होणार्‍या सर्व सामान्य (General) आणि व्यावसायिक कार्यक्रमांच्या (Professional Programmes) ऑफलाईन (Offline Exam) परीक्षा तीन आठवड्यांनी पुढे ढकलल्या आहेत.
Published on

Goa University: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गोव्यात राज्य सरकारने नवीन कोविड निर्बंध लागू केले आहेत. गोव्यात नाईट कर्फ्यू (Night Curfew) जरी नसला तरी नियमांचे पालन करणे सगळ्यांसाठी अनिवार्य आहे. रुग्णसंख्येने जोर धरल्यामुळे गोव्यात लॉकडाऊन होण्याची शक्यता असल्याचे मत टास्क फोर्स सदस्य डॉ. साळकर यांनी मीडियाशी बोलताना व्यक्त केले. ही सर्व परिस्थिति पाहता गोवा विद्यापीठाने (Goa University) नुकत्याच होऊ घातलेल्या परीक्षांबद्दल मोठा निर्णय घेतला आहे.

Goa University postponed the offline examination by three weeks
Goa University postponed the offline examination by three weeksDainik Gomantak

गोवा विद्यापीठाने परीक्षांबबत नुकतेच एक परिपत्रक जाहीर केले आहे. या परिपत्रकात जाहीर केल्याप्रमाणे कोविडच्या बिकट परिस्थितीमुळे 14 जानेवारीपासून होणार्‍या सर्व सामान्य (General) आणि व्यावसायिक कार्यक्रमांच्या (Professional Programmes) ऑफलाईन परीक्षा (Offline Exam) तीन आठवड्यांनी पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे आता या परीक्षा 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये यासाठी विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com