डिचोलीत 'घुमचे कटर घुम'सुरु. शिमगोत्सव मिरवणुकीला उत्साहात प्रारंभ. रोमटामेळ, लोकनृत्य, चित्ररथ पाहण्यासाठी गर्दी उसळली होती.
आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या उपस्थितीत मये भाजप मंडळाची समिती जाहीर. संदीप पार्सेकर यांच्या अध्यक्षतेखाली 31 सदस्यीय समितीची निवड.
आम्ही अॅप आधारित प्रणाली आणण्याचा प्रयत्न करत आहोत, जिथे प्रत्येकजण त्यांच्या आवडीच्या अॅपवर जाऊ शकेल आणि सर्वांना विशिष्ट भाडे मिळेल, जिथे चालकांना फायदा होईल: मंत्री माविन गुदिन्हो
मंत्रिमंडळाचे निर्णय थ्री फेज आणि कमर्शियल मीटरसाठी स्मार्ट प्रीपेड मीटरिंग. डीजी स्मार्ट प्रायव्हेट लिमिटेडला कंत्राट देण्यात आले: मुख्यमंत्री
शिरोड्याचे गोमंतक आयुर्वेदीक महाविद्यालय आणि मंत्री सुभाष शिरोडकर अध्यक्ष असलेल्या शिवग्राम एज्युकेशन सोसायटीच्या कामाक्षी हॉमियॉपॅथी मॅडीकल कॉलेजला आता मिळणार सरकारी आर्थीक अनुदान. मंत्रीमडळाची मान्यता. मुख्यमंत्र्यांची माहिती.
कोकण रेल्वे पोलिसांनी १८,४०० रुपये किमतीच्या १८४ ग्रॅम गांजा जप्त केल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला अटक केली.
गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपने मोठ्या प्रमाणात मते मिळवून कुडतरी मतदारसंघात आपले अस्तित्व निर्माण केले आहे, येत्या निवडणुकीत आम्ही कुडतरी मतदारसंघ जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करू - शर्माद रायतुरकर भाजप प्रभारी कुडतरी मतदारसंघ.
सोनसडा कचरा प्रकल्पाबाहेर टाकलेल्या सुक्या कचऱ्याला रात्री उशिरा आग लागली. मारगांव अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आले, परंतु पुन्हा धूर येऊ लागल्याने लागल्याची शक्यता.
रेती उत्खनन परवान्यांना पुन्हा बसली खीळ; पावसाळ्यापूर्वी अधिकृतपणे उपसा करण्याची शक्यता मावळली.
स्वच्छतादूतांनी घेतली राज्यपालांची भेट. डिचोलीचे नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर यांच्यासह स्वच्छतादूतांनी घेतली राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची भेट. प्लास्टिक मुक्त डिचोलीसाठी सहकार्य करण्याची केली मागणी.
करंजोळ सत्तरी येथील प्रसिद्ध पारंपारिक चोरोउत्सव उत्साहात साजरा, हजारो भाविकांची उपस्थिती.
डिचोलीतील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या गटांमध्ये हाणामारीचा प्रसंग. सकाळी महाविद्यालयात झालेल्या वादाचे परिवर्तन रात्री हाणामारीत. डिचोली एका रेस्टॉरंट समोर झाली हाणामारी. पोलिस तपास सुरू.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.