Literary and Cultural Conference
Literary and Cultural Conference Dainik Gomantak
गोवा

Goa: केरी-फोंडा येथे ‘कोमप’चे शेकोटी साहित्य संमेलन

दैनिक गोमन्तक

Goa: कोकण मराठी परिषद आयोजित सतराव्या शेकोटी साहित्य संमेलनाचे आयोजन 31 डिसेंबर रोजी श्री विजयादुर्गा देवस्थान केरी फोंडा येथे करण्यात येणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झाली आहे. संमेलनाचे उद्‍घाटन गोव्याचे लोकायुक्त न्या. अंबादास जोशी करतील.

तर समारोप 1जानेवारी 2023 रोजी दुपारी होईल. यंदा संमेलनात युवारंग हा विशेष कार्यक्रम होणार आहे. शिवाय अभिनव पद्धतीने नववर्षाचे स्वागत करण्यात येईल, अशी माहिती सल्लागार समितीचे अध्यक्ष ॲड. रमाकांत खलप, ‘कोमप’च्या सचिव चित्रा प्रकाश क्षीरसागर यांनी दिली.

संध्याकाळी 6.30 वा.संमेलनाचे उद्‍घाटन न्या.अंबादास जोशी यांच्या हस्ते होईल. स्वागत संस्थेचे अध्यक्ष सागर जावडेकर करतील. प्रास्ताविक ॲड. रमाकांत खलप करतील. संमेलनाध्यक्षांचा परिचय प्रा.नारायण महाले करतील. व्यासपीठावर देवस्थानचे अध्यक्ष संतोष देसाई उपस्थित असतील. सूत्रसंचालन प्रा. गोविंद भगत करणार आहेत.

संमेलनात एक जानेवारी रोजी पहाटे सहा वाजता संमेलनाध्यक्षांनी सूचवलेल्या विषयावर डॉ. बसवेश्वर चेणगे यांच्या अध्यक्षतेखाली चाफा कविसंमेलन होईल.

‘मिळून साऱ्याजणी-माझिया अंगणात सये’ या 11 ते 12 वाजेपर्यंत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात प्रा. पौर्णिमा केरकर, चित्रा प्रकाश क्षीरसागर, कालिका बापट, दीपा मिरिंगकर, नंदिनी कुलकर्णी, शुभदा च्यारी, आसावरी कुलकर्णी सहभागी होतील. समारोप सत्रात स्वप्ना धुपकर आणि ज. अ. रेडकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येईल. दुपारी 2.30 ते 4 या वेळेत निमंत्रितांचे कविसंमेलन होईल. कविसंमेलनच्या अध्यक्षस्थानी सोलापूर येथील पद्माकर कुलकर्णी व प्रकाश पायगुडे (पुणे) असतील.

पुस्तक प्रकाशन; युवा सृजन कलारंग

उद्‍घाटन सत्रात ज्येष्ठ कवी मोहनराव कुलकर्णी यांच्या दोन पुस्तकांचे व ज. अ. रेडकर यांच्या एका पुस्तकाचे तसेच आसावरी कुलकर्णी, रेखा पौडवाल, डॉ. गुरुदास नाटेकर यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येईल. भोजनानंतर रात्री 9.30 ते 12.30 युवा सृजन कलारंग हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाचे संयोजन कालिका बापट यांचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loksabha Election 2024 : मडकईतून ९० टक्के मतदानासाठी प्रयत्न भर! सुदिन ढवळीकर

Goa Today's Live Update: लोकसभा निवडणूक! गोवा पोलिसांकडून तपासणी नाक्यावर वाहनांची कसून तपासणी

Goa Demand High Court: गोव्यात स्वतंत्र उच्च न्यायालयाची मागणी; बार असोसिएशनचा ठराव

Harmal News : मांद्रे-जुनसवाडात पदपुलाचे पत्रे तुटले; लोखंडी पदपुलाची दुर्दशा

700 महिलांची सेक्स ट्रॅफिकिंग करुन HIV पॉझिटिव्ह बनवण्याचे घृणास्पद कृत्य; 'या' देशातील ह्रदय पिळवटून टाकणारी घटना

SCROLL FOR NEXT