Waterfalls in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Waterfall: गोव्यात कोणत्या धबधब्यांना भेट देऊ शकता, कोणते धबधबे धोकादायक? पाहा संपूर्ण यादी

Goa Monsoon: राज्यातील कमी धोकादायक धबधबे सर्वांसाठी खुले असतील असा खुलासा वनमंत्री विश्वजीत राणे यांनी केला आहे.

Pramod Yadav

Goa Waterfall Latest Update

गोव्यात पावसाळ्यात धबधबे आणि नदीवर जाण्यास वन खात्याने बंदी घातली आहे. राज्यात वाढत्या दुर्घटना लक्षात घेता याबाबत आदेश लागू करण्यात आला. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्याला अशाप्रकारची बंदी मारक ठरु शकते असे वक्तव्य पर्यटनमंत्र्यांनी केल्यानंतर राज्यातील कमी धोकादायक क्षेणीतील धबधबे सर्वांसाठी खुले करण्यात आले आहेत.

राज्यात एकूण 28 धबधबे असून, त्यांची कमी धोकादायक, मध्यम आणि उच्च धोकादायक अशा तीन श्रेणीत वर्गीकरण करण्यात आले आहे. यापैकी कमी धोकादायक श्रेणीतील धबधबे सर्वांसाठी खुले करण्यात आले आहेत.

सत्तरी तालुक्यातील कमी धोकादायक धबधबे- पाली, हिवरे, चरावणे, गोलावळी, गुंगूलडे, चिदंमबरम, नाणेली, उकईची खाडी, कुमठल, मदीयाणी आणि खाडी गुळेली.

याशिवाय बांधावयलो वझार, मयडा (कुळे), भाटी (नेत्रावळी), कुस्के (खोतीगाव) असे एकूण पंधरा कमी धोकादायक धबधबे सर्वांसाठी खुले करण्यात आले आहेत. (Waterfalls Closed Goa)

Waterfalls In Goa

List Of Low Risk Waterfalls

1) Pali, Sattari

2) Hivrem, Sattari

3) Charavne, Sattari

4) Golauli, Sattari

5) Gunguldem, Sattari

6) Chidambaram, Sattari

7) Naneli, Sattari

8) Ukaichee Khadee, Kumthal, Sattari

9) Kumthal, Sattari

10) Madiyani, Gululem, Sattari

11) Khadee, Gululem, Sattari

12) Bandhavoilo Vazar

13) Maida, Collem

14) Highway near Dudhsagar temple

15) Bhati, Netravali

16) Kuske, Cotigao

High Risk

Satrem, Vainguinim, Jalavani, Barazan, Ladkyacho Vazar, Dudhsagar, Tambdi Surla, Bhoma, Highway Bamangudo, Mainapi, Savari

Moderate Risk

Tulaskond Pendral, Bhallan, Assodem, Surunguli, Talde, Highway Mahavir gate, Highway view point, Pikle wadi, Pali, Mashitole And Balfond

यासह सात्रे, वायंगणी, जळावणी, दुधसागर, तांबडी सुर्ला, भोमा, मैनापी यासारखे धबधबे अतिधोकादायक श्रेणीत ठेवण्यात आले आहेत. (is dudhsagar waterfall open now)

गेल्यावर्षी धबधब्यावर बुडून मृत्यू होणाऱ्यांची संख्येत वाढ झाली होती. त्यानंतर सरकारने राज्यातील कमी धोकादायक धबधब्यांची यादी प्रसिद्ध केली होती. यावर्षी देखील सरकारकडून यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्यातील कमी धोकादा यक धबधबे सर्वांसाठी खुले असतील असा खुलासा वनमंत्री विश्वजीत राणे यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT