Fatorda MLA Vijai sardesai Dainik Gomantak
गोवा

Goa liquor Smuggling: जीव धोक्यात, तिजोरीची लूट; दारु तस्करीबाबत विजय सरदेसाईंचे वित्त सचिवांना पत्र

Goa liquor Smuggling Issue: मद्य तस्करीमुळे राज्याच्या प्रतिष्ठेला देखील फटका बसत आहे. याबाबत विजय सदेसाईंनी सचिवांकडे पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे.

Pramod Yadav

मडगाव: आमदार विजय सरदेसाई यांनी गोव्यातील मद्य तस्करीचा मुद्दा वित्त सचिवांना पत्र लिहून मांडला. अवैध मद्य तस्करी ही केवळ गुन्हेगारी समस्या नाही तर राज्यातील नागरिकांची आर्थिक फसवणूक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे गोव्याची प्रतिष्ठा देखील खराब होत असल्याचे मत त्यांनी मांडले आहे.

राज्यातील मद्य तस्करीचा मुद्दा भीषण झाला आहे. गोव्यातून छुप्या पद्धतीने दारुची तस्करी केली जात आहे. राज्याच्या सीमेवर तैनात असणाऱ्या पोलिस आणि अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांना चमका देऊन मद्याची तस्करी केली जाते. याचा राज्याच्या तिजोरीला देखील मोठा फटका बसत असून, राज्याच्या प्रतिष्ठेला देखील फटका बसत आहे. याबाबत विजय सदेसाईंनी सचिवांकडे पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे.

विजय सरेदसाई यांनी पावसाळी अधिवेशनात देखील याबाबत मुद्दा उपस्थित केला होता. "गोवा मद्य तस्करीचा राष्ट्रीय पर्याय बनण्याच्या उंबरठ्यावर आहे. यामुळे गोव्याची प्रतिष्ठा खराब होते आहे. जीव धोक्यात आहेत, राज्याची तिजोरी लुटली जात आहे. तस्करीच्या या अवैध उद्योगाला अनियंत्रितपणे वाढू देणे म्हणजे जनतेच्या विश्वासघातासारखे आहे," असे सरदेसाईंनी सचिवांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.

"मद्य तस्करीची ही केवळ गुन्हेगारीची समस्या नाही तर गोव्यातील लोकांविरुद्धची आर्थिक फसवणूक आहे," असे मत गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई पत्रातून मांडले आहे. एक महिन्यापूर्वी पेडणे येथे मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा असलेल्या आयशर ट्रकला आग लागली होती. याचा चालक घटनास्थळावरून फरार झाला होता. ट्रकमधील मद्यसाठा पणजीतून घेतल्याचे समोर आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT