Goa Liquor Seized Dainik Gomantak
गोवा

Goa Liquor Seized: पत्रादेवी चेकपोस्टवर दारू जप्त, तब्बल 'एवढ्या' लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी घेतलाय ताब्यात

कर्नाटकातील निवडणुका संपल्या असल्या तरी पोलिसांकरवी अद्याप चेकपोस्टवर वाहनांची कसून तपासणी सुरू आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Liquor Seized गोव्यातून महाराष्ट्रासह लगतच्या कर्नाटक राज्यात अवैधरित्या दारूची वाहतूक केली जाते. अबकारी अधिकार्‍यांच्या सतर्कतेने बऱ्याचदा चेकपोस्टवर अवैधरित्या दारू वाहतूक करणारी वाहने जप्त केली जातात.

नुकतीच अशीच एक घटना घडली असून बांदा पत्रादेवी चेकपोस्टवर शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास तब्ब्ल 22 लाखांची दारू जप्त करण्यात आली आहे.

हा ट्रक चेकपोस्टवर तपासणी करीत थांबवला असता ड्रायव्हरने गाडीत बांधकामासाठी लागणारे ACC ब्लॉक असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी ड्रायव्हरला थोडा दम देताच त्यांनी गाडीत दारू असल्याचे मान्य केले.

पोलिसांनी मुद्देमाल ताब्यात घेतला असून गोवा बनावटीच्या या दारूची किंमत तब्बल 22 लाख एवढी आहे.

नुकत्याच कर्नाटकात निवडणुका पार पडल्या असून या निवडणुकांच्या वेळी मतदार दारू सारख्या प्रलोभनांना बळी पडू नयेत, निवडणूक मुक्त व निष्पक्ष व्हावी यासाठी चेकपोस्टवर सर्व वाहनांची कसून तपासणी करण्याचे निर्देश उत्पादन शुल्क आयुक्तांनी दिले होते.

निवडणुका संपल्या असल्या तरी पोलिसांकरवी अद्याप चेकपोस्टवर वाहनांची कसून तपासणी सुरूच असल्याचे यावेळी पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नियम पाळा नाहीतर गाशा गुंडाळा! मुलांच्या ऑनलाईन सुरक्षेवर सरकारचा मास्टरस्ट्रोक; इंस्टाग्राम अन् फेसबुकवर करडी नजर

DA Hike 2026: ऑक्टोबर महिन्यात धमाका! नवरात्र-दिवाळीआधी 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट; महागाई भत्त्यात 4 टक्के वाढीचा जॅकपॉट

Houthi Missile Attack Saudi Arabia: मध्य पूर्वेत महायुद्धाचा भडका! हूतींच्या ड्रोन-मिसाईल हल्ल्याने पुन्हा हादरला सौदी अरेबिया; 3 शहरांमध्ये इमर्जन्सी जाहीर

UPI Payment New Rule: यूपीआय वापरणाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर! 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर 1 रुपयाही चार्ज लागणार नाही; गॅझेट नोटिफिकेशन जारी

Horoscope 15 September 2026: ग्रहांचा मोठा फेरबदल! पैशांच्या बाबतीत 'या' राशी ठरणार लकी; आजच्या दिवशी नोकरीत नवीन संधीचा सुवर्णयोग

SCROLL FOR NEXT