Goa News|Liquor Bottles Dainik Gomantak
गोवा

Goa News: खिंड-मोरजी विकास प्रकल्पात दारुच्या बाटल्यांचा झाला खच

खिंड-मोरजी विकास प्रकल्प परिसरात मोठ्या प्रमाणात बियरच्या बाटल्यांचा खच पडल्याचे चित्र दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत मोरजी पंचायत क्षेत्रातील खिंड परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास प्रकल्प तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी उभारला होता. सध्या या प्रकल्पाचा गैरवापर केला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात बियरच्या बाटल्यांचा खच पडल्याचे चित्र दिसत आहे.

मोरजी पंचायत क्षेत्रातील खिंड परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी मोरजी येथील श्री मोरजाई देवस्थान समिती आणि महाजन आणि देवस्थानची जागा पर्यटन महामंडळाला काही करारानुसार प्रकल्प उभारण्यासाठी दिली होती.

त्या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या संकल्पनेतून दर्जेदार प्रकल्प तयार झाला होता. या प्रकल्पाचा चांगल्या कामासाठी उपयोग करण्याऐवजी आता डोंगराच्या बाजूला ज्या ठिकाणी पार्किंग वाहतूक व्यवस्था केली जाते.

त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी काही युवक दारू पिऊन बाटल्या टाकतात. त्यामुळे तिथे बियरच्या बाटल्यांचा खच पडल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांनी पेट्रोलिंग करून अशा गैरकृत्यांवर आळा घालावा, अशी मागणी पंच उमेश गडेकर यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT