Bicholim Dainik Gomantak
गोवा

Bicholim: दुरुस्तीकामासाठी वीज खांबावर गेला अन् जीव गमावून बसला, डिचोलीत लाईनमनचा मृत्यू

Bicholim: वीज खांबावर चढून दुरुस्तीकाम करताना विजेचा धक्का बसल्याने एका लाईनमनचा दुर्दैवी अंत होण्याची घटना डिचोलीत घडली.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim

वीज खांबावर चढून दुरुस्तीकाम करताना विजेचा धक्का बसल्याने एका लाईनमनचा दुर्दैवी अंत होण्याची घटना डिचोलीत घडली. ही घटना आज (शुक्रवारी) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास व्हाळशी येथे मुख्य रस्त्यावर घडली. मनोज जांबावलीकर (वय ३५) असे या मृत्युमुखी पडलेल्या लाईनमनचे नाव आहे.

दुरुस्ती कामासाठी मनोज वीज खांबावर चढला, त्यावेळी वीजप्रवाह बंद करण्यात आला होता. मात्र, काम करताना अचानक मनोज याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि तो खांबावरच चिकटून राहिला.

वीज खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार या घटनेची चौकशी हाती घेण्यात आली आहे. एका आस्थापनातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी मनोज हा लाईनमन वीज खांबावर चढला होता असे समजते.

कारण अस्पष्ट

बंद केलेला वीजप्रवाह सुरू कसा झाला, त्याचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, वीजप्रवाह बंद केल्यानंतर जवळच्या एका आस्थापनातील इन्व्हर्टर प्रवाहित झाल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दोन तास मृतदेहाची परवड

अर्ध्या तासाहून अधिक वेळ खांबावर व नंतर खांबावरून उतरल्यानंतर असे मिळून जवळपास दोन तास मृतदेह घटनास्थळीच होता. त्यामुळे मृतदेहाची परवड झाली. दोन तासानंतर मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात पाठवण्यात आला.

मृतदेह घटनास्थळावरून हलविल्यानंतर डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची त्वरित चौकशी करण्याचे आदेश त्यांनी वीज खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले.

जमाव आक्रमक

या घटनेनंतर त्या ठिकाणी जमलेला पिळगाव भागातील जमाव आक्रमक बनला. जोपर्यंत वीज खात्याचे अधिकारी येऊन घटनेबाबत स्पष्टीकरण देत नाहीत, तोपर्यंत मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यास देणार नाही अशी आक्रमक भूमिका पिळगाव येथील संतप्त युवकांनी घेतली.

जवळपास दीड तासानंतर वीज खात्याचे साहाय्यक अभियंता वल्लभ सामंत अन्य अधिकाऱ्यांसह घटनास्थळी आले. त्यांनी संतप्त लोकांची समजूत काढताना प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून दोषी असलेल्यांवर कारवाई करण्यात येईल. तसेच मनोज जांबावलीकर यांच्या कुटुंबाला न्याय देण्याची ग्वाही दिली. त्यानंतर जमाव काहीसा शांत झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT