Goa SSC Exam: गोव्यात पूर्णत: अंध विद्यार्थ्याने संगणकाच्या मदतीने कशी दिली दहावीची परीक्षा?

Goa SSC Exam: साईश तो नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (NAB) गोवाचा विद्यार्थी असून, सांताक्रूझ हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहे.
Goa SSC Exam
Goa SSC ExamDainik Gomantak
Published on
Updated on

Goa SSC Exam

गोव्यात 100 टक्के दृष्टिहीन (अंध) विद्यार्थ्याने लेखक किंवा मदतनीस यांच्या सहकार्याशिवाय संगणकावर दहावीची (SSC) परीक्षा दिली.

साईश गावठणकर असे या पंधरा वर्षीय विद्यार्थ्याचे नाव आहे. साईश तो नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (NAB) गोवाचा विद्यार्थी असून, सांताक्रूझ हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहे.

साईशने नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड येथे संगणक प्रशिक्षण घेतले आहे. या प्रशिक्षणाच्या जोरावरच त्याला परीक्षा देणे शक्य झाले आहे.

साधारणत: NAB चे विद्यार्थी स्क्राईबवर अवलंबून असतात पण पुढे परिक्षेच्यावेळी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दरम्यान, 2020 पासून डिजिटल प्रगतीमुळे विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देण्यात आले असून, याची त्यांना परिक्षेसाठी मदत होत आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, साईश म्हणाला त्याने लॅपटॉप, स्पीकर, प्रिंटर आणि रिडरच्या मदतीने परीक्षा दिली.

प्रश्नपत्रिकेतील प्रश्न रीडरच्या मदतीने समजत होते, प्रश्न वाचल्यानंतर मी उत्तर लिहायाला सुरुवात करायचो. त्यानंतर स्क्रीन रीडर लिहलेले उत्तर वाचून दाखवत असे, अशी माहिती त्याने वृत्तपत्राला दिली. परिक्षेसाठी त्याने भरपूर मेहनत घेतल्याचे देखील त्यांने सांगितले.

दहावीनंतर अकरावी आणि बारावीचे शिक्षण घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे साईश म्हणाला. परीक्षेत प्रश्नांची उत्तरे स्वत:च देण्याचा आनंद वेगळा असल्याचे मत त्याने व्यक्त केले.

गोवा उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने संगणकीकृत परीक्षा प्रणाली विकसित केली असून, अंध विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन परीक्षेसाठी तयार केले जाते. यामुळे विद्यार्थ्यांना स्वत:च परीक्षेत उत्तरे देता येतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com