Lineman Babu Gelekar Dainik Gomantak
गोवा

Goa: डिचोलीत विजेच्या खांबावर शॉक लागून लाईनमनचा मृत्यू!

वीज खात्याच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय.

दैनिक गोमन्तक

Bicholim: वीजखांबावर दुरुस्तीचे काम करताना विजेचा ‘शॉक’ बसल्याने 45 वर्षीय लाईनमन मृत्युमुखी पडला. ही दुर्दैवी घटना काल बुधवारी सायंकाळी लामगाव-डिचोली येथे घडली. बाबू बाबलो गेळेकर असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून, तो नार्वे येथील रहिवासी होता.

बाबू खाली कोसळताच सहकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रात आणले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी डिचोली पोलिस उपनिरीक्षक अनिल पोळेकर पुढील तपास करीत आहेत.

सध्या पावसाळी वातावरण असून गोव्यालाही पावसाने झोडपले आहे.काल बुधवारी सायंकाळी लामगाव-डिचोली गावातील वीज तारांचे काम करीत असताना बाबू गेळेकर यांना वीजेचा जोरदार झटका लागून त्यांना आपला जीव गमावावा लागला आहे.

दरम्यान, बाबू वीजेचा झटका लागून अचानक खाली कोसळताच त्यांच्यासोबत असलेले सहकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ सामाजिक आरोग्य केंद्रात नेले. ही बातमी गावात पसरताच आरोग्य केंद्रात नागरिकांनी एकच गर्दी केली होती. बाबू यांच्या घटनेने नार्वे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

तसेच, काही महिण्याआधीच देखील अशी दुर्घटना कणकिरे येथे घडली होती.कर्मचारी संजय गांवकर यांचा वीज वाहिनी दुरुस्त करत असतांना मृत्यू झाला होता. विजेचा झटका लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT