Goa Weather Update
Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: गोव्यात पुढील 3-4 तासांत गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता

Pramod Yadav

गोव्यातील दोन्ही जिल्ह्यात पुढील 3-4 तासांत हलक्या ते मध्यम गडगडाटी वादळांचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. तसेच, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज गोवा हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

हवामान खात्याने याकाळात नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

गोव्यातील विविध तालुक्याच्या दिशेने वादळी वारे येत असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

पेडणे, डिचोली, सत्तरी, धारबांदोडा, सांगे, काणकोण आणि इतर तालुक्यांना वादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच, याकाळात दोन्ही जिल्ह्यातील विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. असे हवामान खात्याने म्हटले आहे.

कोकण, गोव्यातील काही भागात पावसाची हजेरी

आज सकाळी महाराष्ट्रातील कोकण परिसरात आणि गोव्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. रत्नागिरीत झालेल्या मुसळधार पावसामुळे परशुराम घाटात दरड कोसळली, यामुळे रस्तावर आलेल्या मातीमुळे चिखल झाला. याचा महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला व अनेक तास वाहतूक कोंडी झाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचा अमली पदार्थ जप्त

Goa Crime News: समाज कल्याण खात्याचे मंत्री फळदेसाईंना धमकी, 20 कोटी खंडणीची मागणी; संशयिताला जामीन

Cape News : पिर्ल, केपेत बेकायदा चिरे खाणीवर धाड; खनिजकर्म खात्याची कारवाई

Electrocution At Miramar: वीज अंगावर पडून मिरामार येथे केरळच्या व्यक्तीचा मृत्यू; सुदैवाने पत्नी, मुले बचावली

Covaxin Side Effect: कोविशील्डनंतर Covaxin वादाच्या भोवऱ्यात; अनेक दुष्परिणाम जाणवत असल्याचे अभ्यासातून उघड

SCROLL FOR NEXT