Mumbai Goa Highway Accident: वाहतूक कोंडी अन् महाड येथे कोळशाचा ट्रक आणि एसटी बसचा अपघात; सातजण जखमी

महाड शहरानजीक नाते खिंड येथे हा अपघात झाला.
Mumbai Goa Highway
Mumbai Goa HighwayDainik Gomantak

Traffic Jam And Mumbai Goa Highway Accident: कोकण भागात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अशात मुंबई-गोवा महामार्गावर पहाटे पाचपासून वाहतूक कोंडी झाली आहे. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक आणि बसचा अपघात झाला असून, यात सात प्रवासी जखमी झाले आहेत.

महाड शहरानजीक नाते खिंड येथे हा अपघात झाला. जखमींवर महाडच्या ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहुन महाबळेश्वरकडे जाणारी बस आणि कोळशाची वाहतुक करणाऱ्या ट्रकचा खिंड येथे अपघात झाला. अपघातात बसच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. तसेच, ट्रकचे देखील किरकोळ नुकसान झाले आहे.

दरम्यान, सकाळपासून कोकण पट्यात पूर्वमान्सून पावसाने हजेरी लावली. यामुळे चिपळूण येथील परशुराम घाटात दरड कोसळून रस्त्यावर चिखल झाला. चिखल झाल्याने घाटात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

Mumbai Goa Highway
Mumbai Goa Highway: रत्नागिरीत धो धो! परशुराम घाटात रस्त्यावर चिखल; मुंबई-गोवा महामार्गावर पहाटे पाचपासून ट्रफिक जाम

खेड आणि चिपळूण दोन्ही दिशेला मुंबई गोवा महामार्गावर ती आठ ते दहा किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान, घाटातील चिखल बाजुला करण्यासाठी अजून काही अवधी लागण्याची शक्यता आहे.

येत्या दोन दिवसात गोवा आणि महाराष्ट्रातील विविध भागात पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. काल दोन्ही राज्यात बहुतेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते. तर, आज सकाळी अनेक भागात पावसाने हजेरी लावली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com