Goa Monsoon Update Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update: पुढील चार दिवस उत्तर, दक्षिण गोव्यात पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

उत्तर आणि दक्षिण गोव्यात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवली आहे.

Pramod Yadav

Goa Monsoon Update: गोव्यातील दोन्ही जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 01, 04 आणि 05 जून रोजी उत्तर आणि दक्षिण गोव्यात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवली आहे.

तसेच, 02 आणि 03 जून रोजी दोन्ही जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यावेळी 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्याता खात्याने वर्तवली आहे.

महाराष्ट्र आणि गोवा सीमेवरील किनारपट्टी भागात 75 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे किनारपट्टी भागात वादळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पहाटे दक्षिण गोव्यात पावसाची हजेरी

जूनच्या पहिल्याच दिवशी दक्षिण गोव्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मडगावमध्ये सकाळी सोसाट्याचा वारा त्यासह पावसाच्या सरी बरसल्या, अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची तारांबळ उडाली.

पाऊस आणि वाऱ्यामुळे काही ठिकाणी घर आणि झाडांची पडझड झाल्याने नुकसान झाले आहे. तर, माहामार्गावर देखील झाड कोसळल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मसाजसाठी गेली अन् नकोसा अनुभव आला, गोव्यातील स्पा सेंटरमध्ये महिला पर्यटकाचा विनयभंग; वर्का येथील प्रकाराने खळबळ

Goa Nightclub Fire: 'बर्च' दुर्घटना, पाचही संशयित 14 दिवस न्यायालयीन कोठडीत!

IND VS SA: धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका सामना रद्द, चाहत्याचं भंगलं स्वप्न; BCCIवर संताप

Hitler DNA Analysis: गंभीर लैंगिक आणि मानसिक आजाराचा सामना करत होता 'हिटलर'; DNA चाचणीतून झाला खळबळजनक खुलासा

चित्रपट हिट, रेहमानचा डान्स सुपरहिट, पण अक्षय खन्ना म्हणतो 'फरक पडत नाही'; धुरंधरच्या यशावर दिलं 3 शब्दांत उत्तर!

SCROLL FOR NEXT