Hello Goenkar Program: हॅलो गोंयकार! CM सावंत शुक्रवारपासून दर महिन्याला जनतेशी साधणार संवाद, तुम्हीही करू शकता फोन

दुरदर्शनवर गोवा चॅनलवरती देखील हा कार्यक्रम लाईव्ह दिसणार आहे.
Hello Goenkar Program
Hello Goenkar ProgramDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant's Hello Goenkar Program To Start From Friday: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी जनतेशी संवाद साधणार आहेत. 'हॅलो गोंयकार' असे या कार्यक्रमाचे नाव निश्चित केले असून, उद्या म्हणजेच (02 जून) शुक्रवारपासून या कार्यक्रमाची सुरूवात होणार आहे. दुरदर्शनवर देखील हा कार्यक्रम लाईव्ह दिसणार आहे.

दुरदर्शन गोवा चॅनलवरती शुक्रवारी सायंकाळी 07 ते 08 या वेळेत हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे. या कार्यक्रमात राज्यातील जनतेला देखील फोनच्या माध्यमातून सहभागी होता येणार आहे. यासाठी 0832 - 2222424 / 2225204 असे दोन नंबर जारी करण्यात आले आहेत. या नंबरवर फोन करत लोक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात.

या कार्यक्रमात कोण कोणत्या विषयांवर मुख्यमंत्री चर्चा करणार याबाबत पुरेशी माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, सरकारी योजना, त्याची अंमलबाजावणी, विकास यासारख्या विषयांवर या कार्यक्रमाद्वारे संवाद साधला जाईल अशी माहिती समोर आली आहे.

Hello Goenkar Program
Lightning in Curchorem Video: कुडचडे येथे घरावर पडली वीज, गरीब महिलेच्या घराचे मोठे नुकसान

दरम्यान, गोव्यात देखील आता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेशी मन की बात कार्यक्रमाद्वारे संवाद साधतात त्याप्रमाणे मुख्यमंत्री सावंत जनतेशी संवाद साधतील.

Hello Goenkar Program
महत्वाची बातमी! 108 च्या नेटवर्कमध्ये व्यत्यय, गरूजूंसाठी नवा अत्यावश्यक नंबर जाहीर

'मन की बात'च्या धर्तीवर राज्यात स्वयंपूर्ण गोवाच्या अंतर्गत गोव्यातील जनतेशी संवाद साधणारा एक कार्यक्रम सुरु करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फेब्रुवारीत केली होती. प्रत्येक महिन्यात गोवा सरकारमधील एक मंत्री सरकाच्या विविध उपक्रमांची तसेच योजनांची माहिती या संबोधनातून देणार असल्याचे सावंत म्हणाले होते.

दरम्यान, 'हॅलो गोंयकार' या कार्यक्रमामुळे प्रत्येक महिन्याला राज्याचे मुख्यमंत्री आणि जनतेचा संवाद होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com