Asani Cyclone Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Update: राज्यात येत्या पाच दिवसात तुरळक पावसाची शक्यता

यंदाचा पाऊस संपण्याला अवघे सात-आठ दिवस उरले

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा राज्यात पुढील पाच दिवस तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने व्यक्त केली आहे. या हंगामातला पाऊस संपण्याला अवघे सात-आठ दिवस उरले असून मान्सूनचा पाऊस मंदावला असून धुके आणि थंडीतला गारवा वाढू लागला आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने सरासरी पावसाची तूट वाढतच असून आज ती 7.9 टक्के इतकी झाली आहे.

(Light to moderate rain likely next five days in goa)

गेल्या चार दिवसांपासून उघडीप दिलेल्या पाऊस आणखी 4 दिवस म्हणजे 25 सप्टेंबर पर्यंत असाच तुरळक स्वरूपात पडणार आहे, अशी माहिती वेधशाळेने दिली आहे. 18 जुलै ते 7 सप्टेंबर दरम्यानच्या 50 दिवसांपैकी 48 दिवस सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

2922.7 मिलिमीटर पावसाची अपेक्षा असताना केवळ 2692.6 मिलिमीटर पाऊस पडला आहे. हा पाऊस सरासरीपेक्षा 7.9 टक्के कमी झाला आहे. गेल्या 24 तासात केवळ 1.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यात केवळ सांगे येथे 5 मिमी.केपे येथे 5 मिमी. तर मुरगाव येथे 3.8 मिमी. पाऊस झाला आहे. अन्यत्र पाऊस पडला नाही .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mungul Crime: मुंगुलप्रकरणी नवी अपडेट! हल्ल्यानंतर गँगस्टर वेलीने घेतली 60 लाखांची कार; काणकोणमधील एकजण पोलिसांच्या रडारवर

Goa Politics: 'भाजपला पराभूत करण्‍यासाठी गोवा फॉरवर्ड आणि आरजीपीला सोबत घेऊन लढू', पाटकरांनी केले युतीचे सूतोवाच

Candolim: मद्यधुंद पर्यटकांचा गोव्यात धुडगूस! कांदोळी बीचवर 10 दुचाक्यांची तोडफोड; बंगळुरूच्या 5 जणांना घेतले ताब्यात

Goa Road Repair: '..येत्‍या 15 दिवसांत रस्‍ते सुधारू'! CM सावंतांचे आश्‍‍वासन; खड्डेमय रस्‍त्‍यांवरून ‘आप’ आक्रमक

Horoscope:नोकरीत सांभाळा,आरोग्याचा विचार करा, प्रेमसंबंधात गोडवा वाढेल; वाचा तुमची रास काय सांगते?

SCROLL FOR NEXT