Srimad Vidyadhishtirtha Swami Dainik Gomantak
गोवा

इंद्रियांवर ताबा ठेवल्यानेच जीवनयात्रा सफल: श्रीमद् विद्याधिशतीर्थ स्वामी

श्री सांतेरी व श्री महालसा नारायणी देवींच्या जत्रौत्सवानिमीत्त महारथोत्सवास आज श्रीमद् विद्याधिशतीर्थ स्वामीजींनी उपस्थित राहुन विविध धार्मिक कार्यक्रमांत भाग घेतला.

दैनिक गोमन्तक

मडगाव: मनुष्यजन्मातच परमेश्वराची भक्ती करण्याचे भाग्य सर्वांना लाभते. त्यामुळे शिस्त व शरीरावर ताबा ठेऊनच प्रत्येकांने चांगल्या गुणांचे आचरण करावे. आजच्या काळात प्रत्येकाने आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवल्यास जीवनयात्रा सफल होते असे उद्गार श्री गोकर्ण पर्तगाळी जिवोत्तम मठाधिश श्रीमद् विद्याधिशतीर्थ श्रीपाद (Srimad Vidyadhishtirtha Swami) वडेर स्वामी महाराजांनी आज म्हार्दोळ येथिल श्री महालसा संस्थानात आशिर्वचन करताना काढले.

श्री सांतेरी व श्री महालसा नारायणी देवींच्या जत्रौत्सवानिमीत्त महारथोत्सवास आज श्रीमद् विद्याधिशतीर्थ स्वामीजींनी उपस्थित राहुन विविध धार्मिक कार्यक्रमांत भाग घेतला. (Life is successful by controlling the senses Srimad Vidyadhishtirtha Swami)

परमेश्वराचे आपण स्मरण केल्यानेच देव देवतांचा आशिर्वाद लाभतो. आज बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात देव भक्ती करणे गरजेचे असुन, प्रत्येकांने आपले कुलदेव, ग्रामदेवांचे स्मरण सदोदीत करावे असे स्वामीजी म्हणाले.

श्रीमद् विद्याधिशतीर्थ स्वामीजींचे संस्थानात आगमन झाल्यानंतर मंगलवाद्यांच्या गजरात तसेच पारंपरीक इलामतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर देवस्थान समिती अध्यक्ष श्रीवल्लभ पै रायतुरकर यांनी स्वामीजींचे स्वागत केले व सपत्नीक पाद्यपुजा केली. स्वामीजींनी श्री सांतेरी देवीच्या तैलचित्राचे तसेच देवस्थानच्या वार्षीक कार्यक्रम पुस्तीकेचे अवानरण केले.

श्रीमद् विद्याधिशतीर्थ स्वामीजींच्या हस्ते श्री सांतेरी व श्री महालसा देवींचे रथारोहण व ध्वजारोहण करण्यात आले. संस्थानचे सचिव संदिप पै वैद्य यांनी सुत्रसंचालन व प्रास्तावीक केले.

यावेळी गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत, श्री शांतादुर्गा संस्थान गोठणचे अध्यक्ष किरण पडियार, श्री दामोदर देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश कुंदे तसेच महाजन, कुळावी, भजक मोठ्या संख्येने उपस्थीत होते. रात्रौ महारथोत्सव, अष्टावधान सेवा , महाआरती आदी धार्मिक विधी पार पडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT