Utpal Parrikar Dainik Gomantak
गोवा

‘उत्पल बाबत योग्य निर्णय घेऊ’

उत्पल पर्रीकरांना पणजीकरांची साथ आहे; सुदिन ढवळीकर

दैनिक गोमन्तक

गोव्याच्या राजकारणात दिल्लीहून आलेल्या प्रमुख राजकीय पक्षांना मगो पक्षाच्या मुशीत तयार झालेल्या आमदारांनी मोठे केले. मगो पक्षात अनेक स्थित्यंतरे आली, कार्यकारिणी स्तरावर अनेक उलथापालथी घडल्या, पण मगोच्या सिंहाची डरकाळी कायम विधानसभेत घुमली आहे, असे माजी उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी सांगितले. नुकतेच गोव्यात विधानसभेचे मतदान पार पडले आहे. सत्तास्थापणेसाठी निवडणूक लढवणारे पक्ष दावा करत आहेत. या पार्श्वभूमीवर सुदिन ढवळीकर बोलत होते.

दरम्यान, यावेळेला अपक्ष उमेदवार महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. अपक्षांचे समर्थन घ्यायचे झाले तर... या प्रश्‍नावर काही अपवाद सोडल्यास बऱ्याच ठिकाणी अपक्ष उमेदवार भाजपने (BJP) उभे केले आहेत, तर काही ठिकाणी अन्य राजकीय (Politics) पक्षांनी. त्यामुळे हे अपक्ष उमेदवार प्रामाणिक राहतील काय, हा आधी विचार करावा लागेल. पणजीत उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांना आमचे समर्थन आहे आणि उत्पल पर्रीकरांना पणजीकरांची (Panaji) साथ आहे, त्यामुळे उत्पल निश्‍चितच निवडून येतील आणि उत्पलबाबत मगो युती योग्य निर्णय घेईल, असे सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT