प्लॅनिंग नियमांचे उल्लंघन, मुरगावमध्ये हॉटेल मालकाविरोधात तक्रार

सेटबॅक जमिनीवर अतिक्रमण आणि बांधकाम केले असल्याचे गोवा फर्स्टने आपल्या तक्रारीत म्हटले आहे
Mormugao Illegal Construction
Mormugao Illegal ConstructionDainik Gomantak
Published on
Updated on

मुख्य रस्त्याशेजारी सेटबॅक जमिनीवर बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून बांधकाम केल्याप्रकरणी स्वतंत्र पथ मार्गावरील आयडीबीआय बँक समोरील हॉटेल, एचक्यूचे मालक आणि व्यवस्थापना विरुद्ध पालिकेत तसेच मुरगाव नियोजन विकास प्राधिकरणात गोवा फर्स्ट या बिगर सरकारी संस्थेतर्फे तक्रार दाखल केली आहे. गोवा फर्स्टने केलेल्या तक्रारीनुसार हे हॉटेल मुरगाव नियोजन विकास प्राधिकरण आणि मुरगाव प्लॅनिंगच्या नियमांचे उल्लंघन करून त्या जागेवर बेकायदेशीररित्या बांधकाम (Construction) केले आहे.

विकास प्राधिकरण कोणत्याही बिल्डरला किंवा जमिनीच्या मालकाला सेटबॅक जमिनीवर बांधकाम करण्याची परवानगी देत नाही. मात्र या हॉटेलचे मालक आणि बिल्डरने या नियमांचे उल्लंघन करून सेटबॅक जमिनीवर अतिक्रमण आणि बांधकाम केले असल्याचे गोवा फर्स्टने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

Mormugao Illegal Construction
सर्व शालेय परीक्षा ऑफलाइन मोडमध्ये; मुख्यमंत्री

या हॉटेलचा मालक आणि व्यवस्थापनाने सेटबॅक जमिनीवर अतिक्रमण करून एका बाजूला आणि मुख्य प्रवेशद्वाराला एक राखीव भिंत बांधली आहे. ज्यामुळे पादचाऱ्यांना आणि रस्त्यावरील वाहनांना खूप त्रास होतो. कारण हॉटेलात (Hotel) एखादे पाहुणे आल्यास प्रवेशद्वारावरील सुरक्षा कर्मचारी सामान्य लोकांना फुटपाथवरून जाण्यास मज्जाव करतात. तसेच पाहुण्यांना हॉटेलपर्यंत सोडण्यास आलेली वाहने मुख्य रस्त्यावर उभी करण्यात येतात. यामुळे रस्ता अरुंद असल्याने संपूर्ण स्वतंत्र पथ मार्ग एका टोकाला अडवला जातो. त्यामुळे याचा पादचाऱ्यां बरोबर वाहन चालकावरही परिणाम होतो.

Mormugao Illegal Construction
वार्का येथील वृद्धाचा खून जमीन व्यवहारातून?

या बेकायदेशीर अतिक्रमणाकडे पालिकेने आणि मुरगाव (Mormugao) नियोजन विकास प्राधिकरणाने दुर्लक्ष केले असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांनी परवाने देताना या बांधकामांविरुद्ध ताकीद देऊन कारवाई (Action) करायला हवी होती. मात्र तसे झाले नाही. आता गोवा फर्स्ट संबंधित अधिकाऱ्यांना या बेकायदेशीर कामा विरोधात त्वरित कारवाई करून अतिक्रमण केलेल्या या अवैद्य केलेले काम बांधकाम पाडले जावे अशी विनंती गोवा फर्स्ट ने केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com