Elton Dcosta Dainik Gomantak
गोवा

Panaji News : विदेशात अडकलेल्या गोमंतकीयांना मदत करू! मुख्यमंत्री

Panaji News : राज्यात विदेशी पासपोर्टचे प्रमाण वाढल्याचा डिकॉस्तांचा दावा

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News : पणजी,विदेशात अडकलेल्या गोमंतकीयांना परत येण्यासाठी राज्य सरकार निश्चितपणे मदत करेल. त्यासाठी हा विषय केंद्र सरकारच्या पातळीवर उपस्थित केला आहे.

अनिवासी गोमंतकीयांसाठीच्या आयुक्तालयाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत सांगितले. केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी याविषयी प्रश्न विचारला होता.

डिकॉस्ता म्हणाले, भारतीय पासपोर्ट जमा करून विदेशी पासपोर्ट घेणाऱ्यांचे प्रमाण राज्यात वाढते आहे. त्यांनी गोवा सोडून जाऊ नये म्हणून सरकार कोणते प्रयत्न करत आहे. १० वर्षांत २८ हजार गोमंतकीयांनी भारतीय पासपोर्ट जमा केले. सरकार याविषयी संवेदनशील नाही.

बाणावलीचे आमदार व्हेन्झी व्हिएगस म्हणाले, मुख्यमंत्री फाईलवर शेरा मारल्याचे सांगतात; पण अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात शेरा मारलेला नाही, असे सांगतात.

नेमके सत्य काय आहे. २०४७ मध्ये विकसित गोवा करताना गोमंतकीय नको अशी सरकारची भूमिका आहे का?

या प्रश्नावर एल्टन डिकॉस्ता, वीरेश बोरकर आदी बोलू लागल्यावर सभापतींनी दुसरा प्रश्न पुकारला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran US Israel War: इरणा नवा 'गेमचेंजर' आक्रमक! मोजतबा खामेनेईंनी दिली अमेरिकेला खुली धमकी; जगाची 'लाईफलाईन' रोखणार?

Iran US Israel War: 12 दिवसांचा भीषण बॉम्बवर्षाव, तरीही इराणची सत्ता अभेद्य! अमेरिकन गुप्तचर अहवालानं उडवली ट्रम्प- नेत्यान्याहूची झोप

Bhausaheb Bandodkar: लोकांना विलीनीकरण नको होते, पण 'भाऊ' हवे होते! जनमत कौलानंतरही टिकून राहिले भाऊसाहेब बांदोडकरांचे वलय

Train Viral Video: हद्द झाली..! वयाचं भान नसलेल्या 'त्या' व्यक्तीचा रेल्वेतील व्हिडिओ व्हायरल, तरुणीनं उडवली झोप; सोशल मीडियावर संतापाची लाट

आंध्र प्रदेशात भेसळयुक्त दुधामुळे 13 जणांचा मृत्यू, अजून 7 जण देतायेत मृत्यूशी झुंज; एकाच डेअरीतून दूध घेणाऱ्या 106 कुटुंबांना विषबाधा

SCROLL FOR NEXT