Goa Carnival 2024: पणजीत कार्निव्हलची दिमाखदार सुरुवात; वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक हैराण

Goa Carnival 2024: कार्निव्हल मिरवणूक मुख्य मार्गाने सुरु असल्याने पणजीतील वाहतूक अंतर्गत रस्त्याने वळवण्यात आली होती.
Traffic
Traffic Dainik Gomantak

Goa Carnival 2024: व्हिवा कार्निव्हल...खा...प्या आणि मजा करा, असा संदेश देणाऱ्या किंग मोमोची राजवट काल म्हणजेच शुक्रवारपासून सुरु झाली. पर्वरीत संध्याकाळी कर्टन रेझर संपन्न झाल्यावर कार्निव्हलचा पडदा उघडलं.

आज म्हणजेच शनिवारी राजधानी पणजीत दुपारी 3 च्या सुमारास मोठ्या दिमाखात कार्निव्हलला सुरुवात झाली. रंगीबेरंगी आणि आर्कर्षित असे चित्ररथ पाहण्यासाठी पणजीत शनिवारी दुपारपासूनच प्रेक्षकांनी गर्दी केली होती.

ही मिरवणूक मुख्य मार्गाने सुरु असल्याने पणजीतील वाहतूक अंतर्गत रस्त्याने वळवण्यात आली होती.

दुपारपासून वाहतूक कोंडी:-

पणजीत सुरु असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामामुळे वाहतुकीच्या मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला होता. या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामामुळे काही रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत.

त्यामुळेच शहरात येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी काही मार्ग बदलण्यात आले होते. तसेच कार्निव्हलसाठी आलेल्या प्रेक्षकांनी रस्त्याच्या दुतर्फ़ा आपल्या गाड्या पार्किंग केल्यामुळे वाहतूक कोंडीसाठी होत असलेले दिसून आले.

ट्रॅफिक पोलीस:-

बेशिस्त वाहनचालकांसाठी तसेच रहदारी सुरळीत राहावी यासाठी पणजीतील अंतर्गत रस्त्यांवर चौकाचौकात वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते. मात्र तरीही काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. आझाद मैदान, 18 जून रोड या भागात कमालीची वाहतूक कोंडी दिसून आली.

Traffic
Disallow Valentine Day: व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास अनुमती देऊ नये, गोव्यातील महाविद्यालात हिंदू जनजागृती समितीचे निवेदन
Carnival
Carnival Dainik Gomantak

किंग मोमो - क्लाईव्ह अँथनी ग्रासियस:-

गोव्यात होणाऱ्या यंदाच्या कार्निव्हलसाठीच्या किंग मोमो म्हणून क्लाईव्ह अँथनी ग्रासियस यांची निवड झाली होती. पणजीत शनिवारी 10 फेब्रुवारीच्या कार्निव्हलचे नेतृत्व किंग मोमो क्लाईव्ह अँथनी ग्रासियस यांनी केले. किंग मोमो हा कार्निव्हलचा अधिकृत राजा असतो. नर्तक, विदूषक आणि संगीतकारांचा समावेश असलेल्या त्याच्या पथकाच्या परेडचे नेतृत्व त्यांनी केले.

देशी-विदेशी पर्यटक दाखल-

कार्निव्हल मिरवणूक रस्त्यावर आकर्षक सजावट करण्यात आली आहे. कार्निव्हलसाठी पणजीनगरी सजली आहे. विविध प्रकारच्या रंगीत पताका, आकर्षक मुखवटे , विद्युत रोषणाई आदींनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

कार्निव्हल चित्ररथ मिरवणूक पाहण्यासाठी आंतरराष्ट्रीय पर्यटक देखील हजेरी लावत असतात. कार्निव्हलनिमित्त पणजी शहरात पर्यटकांची रेलचेल असून विदेशी पर्यटकांच्या तुलनेत देशी पर्यटकांची संख्या अधिक आहे.

खा, प्या, मजा करा, असा संदेश देणाऱ्या किंग मोमोच्या राजवटीत सध्यस्थितीत सामाजिक,राजकीय संदेश देणारे चित्ररथ पाहण्यासाठी लोक येत असल्याने उत्साहाचे वातावरण आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com