3 out of 7 dams in Goa have less than 50 percent water storage Dainik Gomantak
गोवा

Dams In Goa: गोव्याची तहान भागवणाऱ्या सातपैकी तीन धरणांत 50 टक्क्यांहून कमी पाणीसाठा

Dams In Goa: राज्याच्या जलसंपदा विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार यातील दोन धरणांची पाणीपातळी 40 टक्क्यांच्या खाली गेली आहे.

Manish Jadhav

3 out of 7 dams in Goa have less than 50 percent water storage: राज्यात सध्या मोठी तापमानवाढ पाहायला मिळत आहे. पारा 33 अंशांच्याही पार पोहोचल्यामुळे उन्हाच्या झळा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम करताना दिसत आहेत. दरम्यान, राज्याला पुन्हा मोठ्या पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील एकूण सात धरणांपैकी तीन धरणांतील पाणीसाठा 50 टक्क्यांच्या खाली गेला आहे. पाण्याबाबत समस्या निर्माण होण्याची भीती सतावू लागली आहे.

दरम्यान, राज्याच्या जलसंपदा विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार यातील दोन धरणांची पाणीपातळी 40 टक्क्यांच्या खाली गेली आहे. तथापि, इतर चार धरणे 50 टक्क्यांच्या वर आहेत, त्यापैकी एका धरणात सध्या 91 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे.

विभागाच्या निवेदनात म्हटले आहे की, अंजुणे जलाशयातून उत्तर गोव्यातील सत्तरी आणि डिचोली तालुक्यांतील काही भागांना पाणीपुरवठा होतो. त्यात 62.6 टक्के पाणीसाठा आहे, तर काणकोण तालुक्याची पाण्याची गरज भागवणाऱ्या चापोली जलाशयात 59.4 टक्के पाणीसाठा आहे. गावणे जलाशयात 56.6 टक्के पाणी शिल्लक आहे, तर तिळारी 91.1 टक्के भरले आहे.

सांगे तालुक्यातील साळावली जलाशय दक्षिण गोव्यातील बहुतांश जिल्ह्यांची पाण्याची गरज भागवतो. ते 49.7 टक्के भरले आहे, तर बर्देश, पेडणे, आणि डिचोली तालुक्याला पाणीपुरवठा करणारा आमठाणे जलाशय 38.3 टक्के भरले आहे. पाचवाडी आणि शिरोडा (दक्षिण गोवा) सारख्या गावांची पाण्याची गरज भागवणारा पंचवाडी जलाशय 39.9 टक्के भरला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

SCROLL FOR NEXT