Goa Leopard Sighting Dainik Gomantak
गोवा

Leopard In Bordem: बोर्डेत बछड्यासह दिसलेला बिबट्या तोच आहे की..? आधीच भीती त्यात संभ्रम

Leopard Sighting In Bordem: साष्टीवाडा-बोर्डे येथे अपघातात जखमी झालेला ''तो'' बिबटा अद्याप पिंजऱ्यात अडकलेला नाही. बछड्यासह बिबट्या नजरेला पडल्याने स्थानिकांमध्ये भीती.

Sameer Panditrao

Leopard Sighting In Bordem Goa

डिचोली: साष्टीवाडा-बोर्डे येथे अपघातात जखमी झालेला ''तो'' बिबटा अद्याप पिंजऱ्यात अडकलेला नाही. त्यामुळे लोकांमध्ये पसरलेली भीती कायम असतानाच, परिसरात आज (मंगळवारी) दिवसाढवळ्या भर लोकवस्तीजवळ एका बछड्यासह बिबट्याचे दर्शन घडले.

बछड्यासह बिबट्या नजरेला पडल्याने स्थानिकांमध्ये भीतीने धडकी भरली आहे. आज सकाळी बछड्यासह बिबट्या संचार करताना काही स्थानिकांनी पाहिले आहे. बछड्यासह दर्शन दिलेला बिबट्या जखमी की अन्य ते मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.

बछड्यासह बिबट्या भर लोकवस्तीजवळ असल्याची माहिती मिळताच आज दुपारी वन खात्याचे पथक साष्टीवाडा येथे दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी केली. पुन्हा बिबट्या नजरेस पडल्यास लगेच संपर्क साधा. असे आवाहन त्यांनी परिसरातील लोकांना केले. बिबट्याचा ठावठिकाणा शोधून काढण्यासाठी कॅमेरे बसविण्याची तयारीही वन खात्याने ठेवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT