Leopard Canva
गोवा

Leopard In Goa: रात्रीच्या वेळी बिबट्याचा संचाराने लोकांच्यात दहशत! कोरगावात भीतीचे वातावरण

गोमन्तक डिजिटल टीम

Leopard Spotted At Goa Korgao

पेडणे : कोरगाव ग्रामपंचायत क्षेत्रात विविध ठिकाणी बिबट्याचा रात्रीच्या वेळी संचार असल्यामुळे लोकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

सदर बिबट्या काल रात्री उशिरा कोरगाव येथील नंदन परब यांच्या घराजवळ काही जणांनी पाहिले. प्रत्यक्ष पाहिलेल्या काहींनी याची माहिती नंदन परब यांना दिल्यावर त्याची खात्री करण्यासाठी त्यांनी घराबाहेर लावलेला सीसीटीव्हीची पाहणी केली.

त्यात बिबटा रस्त्यावरून हिंडताना दिसून आला. हा बिबटा बराच मोठा असल्याचे फुटेज वरून जाणवते. मात्र, या वाड्यावर त्याला कुत्रे किंवा वासरू वगैरे सावज मिळाले नाही.पंधरा-वीस दिवसांअगोदर देवसू येथील चिरेखाण भागातही रात्रीच्या वेळी रस्त्याजवळ हा बिबटा काहीजणांना दिसला होता. तसेच या बिबट्याने या भागातील काही पाळीव कुत्रे तसेच भटक्या कुत्र्यांचीही शिकार केलेली आहे.

कोरगाव ग्रामपंचायत क्षेत्रात झाडे , डोंगर कापून बांधकामे झाल्यामुळे तसेच कोरगावपासून जवळच्या अंतरातील घनदाट जंगल म्हणून ओळखण्यात येणाऱ्या पेडणे पालिका क्षेत्रातील भूतनाथ परिसरात मोठ्या प्रमाणात जंगलतोड होऊन तिथे बांधकामे होत असल्यामुळे प्राणिमात्रांचा अधिवास नष्ट होऊ लागला असून असे जंगली प्राणी लोकवस्तीत येऊ लागले आहेत. लोकवस्तीत अशाप्रकारे बिबटे फिरू लागल्याने कोरगाव परिसरातील लोकांमध्ये भीती पसरली आहे. वन खात्याने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji Smart City: प्रशासन 'पुन्हा' अपघात होण्याची वाट पाहत आहे काय? 'सांतिनेज-पणजी' येथे पुन्हा झाडांकडे अक्षम्य दुर्लक्ष

Goa Art: कॉमर्समधून पदवी घेतलेल्या आशिषचा चित्रकारापर्यंतचा प्रवास, कला क्षेत्रात आर्थिक स्थैर्य असते का?

Bicholim Accident: काळ आला होता पण..! वाठादेव बगलमार्गावर पुन्हा अपघात; पायलट थोडक्यात बचावला

Bhutani Infra: ..तर 'वायनाड'ची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही! सांकवाळ येथे रॅलीतून 'भूतानी' विरोधात इशारा

Mhadei River Dispute: कर्नाटकाने असं पळवलं पाणी, गोव्यातील वकिलांची फौज करते काय?

SCROLL FOR NEXT