Goa Leopard News canva
गोवा

Goa Leopard: रात्री 11 वाजता कुत्र्याला पळवले, शिगाव परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; ग्रामस्थांची उडाली झोप

Shigao Leopard: ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार शिगाव येथील तुरीमरड, काऱ्यामळ, कॅनलवाडा तसेच इतर ठिकाणीहून ग्रामस्थांच्या पाळीव कुत्र्यांना त्यांनी फस्त केले आहे.

Sameer Panditrao

फोंडा: शिगाव भागात बिबट्याने पाळीव कुत्र्यांना पळवून नेण्याचे सत्र चालू केले असून दिवसा व रात्रीचा बिबटा फिरत असल्याने ग्रामस्थांत भीती निर्माण झाली आहे. या बिबट्यापासून कोणाला इजा होण्यापूर्वी वन खात्याने त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शिगाव ग्रामस्थांनी केली आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार शिगाव येथील तुरीमरड, काऱ्यामळ, कॅनलवाडा तसेच इतर ठिकाणीहून ग्रामस्थांच्या पाळीव कुत्र्यांना त्यांनी फस्त केले आहे. सध्या ग्रामस्थ आपल्या पाळीव कुत्र्यांना घरात घालून दार लावत आहेत.

काऱ्यामळ येथील सुकुर फर्नांडिस यांच्या कुत्र्याला ११ वाजता घरातील वरंड्यातून उचलून पळ काढला.कुत्र्याने आवाज केला तेव्हा लगेच ते बाहेर आले असता तोवर बिबटा त्याला घेऊन जंगलात पळाला होता.

ग्रामस्थ चिंतेत

पूर्वी ग्रामस्थांनी तक्रार दिल्यानंतर लगेच वन खाते पिंजरा लावून बिबट्याला पकडत असत. परंतु आता वन खाते कॅमेरे बसवून बिबट्याला हेरतात व नंतर पिंजरा लावून पकडतात. मात्र तोवर बिबट्याचा गावात संचार सुरूच असतो, त्यामुळे ग्रामस्थ चिंतेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजप सरकारचा अहंकार जनता मोडेल! अरविंद केजरीवालांची टीका, कारापूर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा केला निषेध

Section 39A Protest: आता गावागावांतून आंदोलन! कलम '39अ'विरोधात आमदार वीरेश बोरकर यांची घोषणा

खरी कुजबुज: सरकारची अशीही हुशारी!

दणका! वेर्णात वृक्षतोडीला स्थगिती, उच्च न्यायालयाचा निर्णय; तज्ज्ञ समितीकडून पाहणी

Karapur Mega Project Protest: आंदोलकांना पणजीत रोखले; गुन्हे न नोंदविताच सोडले, मेगा प्रकल्पाविरोधात कारापूरवासी एकवटले

SCROLL FOR NEXT