Leopard In Sanquelim Dainik Gomanak
गोवा

Leopard In Sanquelim: साखळीत बिबट्याचा वावर; कुत्री होतायेत गायब, सुर्ला येथे वासरावर हल्ला

बिबट्याचा वावर होत असल्याने परिसरातील नागरिक धास्तावले आहेत.

Pramod Yadav

Leopard Seen In Sanquelim: सावईवेरे-कुळणवाड्यावरील भरवस्तीत माडाच्या झाडावर रविवारी (दि.22) तब्बल 18 तास बिबट्या ठाण मांडून बसला होता. हा प्रकार घडला असतानाच मागील काही दिवसांपासून साखळी परिसरात बिबट्याचे दर्शन होत आहे.

परिसरतील भटकी कुत्री अचानक गायब होत असून, सूर्ला येथे वासरावर बिबट्याने हल्ला करत त्याला जखमी केले आहे. बिबट्याचा वावर होत असल्याने परिसरातील नागरिक धास्तावले आहेत.

साखळी परिसरातील कुडणे, सुर्ला, पर्ये, वेगळे येथील भागात बिबट्याचे दर्शन होत आहे. परिसरातील कुत्रे मागील काही दिवसांपासून गायब होत असल्याने स्थानिकांनी चिंता व्यक्त केली आहे. बिबट्याचा विविध भागात वावर दिसून आल्याचा दावा गावकऱ्यांनी केला असून, त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक करत आहेत.

सीमा भागातील वन्यप्राणी तीव्र उन्हाच्या झळा बसत असल्याने पाण्याच्या शोधात गावात शिरतात. रानटी जनावरांच्या शिरकावामुळे स्थानिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो.

दरम्यान, सुर्ला येथे वासरावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेची पशुवैद्यकीय आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. बिबट्याच्या समस्येवर तातडीने तोडगा काढावा अशी विनंती स्थानिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Satyapal Malik: "गोवेकरांची जगण्याची पद्धतच अनोखी" गोव्याचं कौतुक करताना थकत नव्हते सत्यपाल मलिक

5 बेडरूम, प्रायव्हेट पूल आणि सी व्ह्यू... अजय-काजोलचा गोव्यातला आलिशान व्हिला पाहिलात का? एका रात्रीसाठी मोजावे लागतील 'तब्बल' एवढे

जिवंत मासा गिळला; गोव्यात सहा महिन्यांच्या बाळाचा मृत्यू Watch Video

ST Reservation Bill Passed: गोव्यातील एसटी समाजासाठी आनंदाची बातमी; राजकीय आरक्षण देणारे विधेयक लोकसभेत मंजूर

ST Reservation Goa: 'काँग्रेसमुळे रखडले एसटी समाजाचे राजकीय आरक्षण'; सत्ताधारी - विरोधकांची सभागृहात खडाजंगी

SCROLL FOR NEXT