Leopard Dainik Gomantak
गोवा

लोलये पंचायत क्षेत्रातील माड्डीतळप येथे बिबट्याचा हैदोस

आता पर्यंत पांच पाडसांची हत्या

दैनिक गोमन्तक

लोलये पंचायत क्षेत्रातील माड्डीतळप येथे बिबट्याने हैदोस मांडला आहे.गोठ्यात बांधलेल्या गुरांचा सर्सास या बिबट्याकडून पडशा पाडण्यात येत असल्याचे येथील धनगर वाड्यावरील विठ्ठल मनोहर खरात यांनी सांगितले.दरदिवशी रात्रीच्यावेळी बिबटा गोठ्यात घुसून लहान वासरांना आपले भक्ष्य बनवत आहे.

(Leopard roam at Madditalap in Lolaye Panchayat area)

आता पर्यंत पाच पाडसांची त्याने हत्या केली असून तीन वासरांना जायबंदी केले आहे.त्याचा परिणाम म्हणून नवीन वासरांना जन्म दिलेल्या दुभत्या गाई दूध देत नाहीत. दूध विकून कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्याशिवाय पर्याय नाही मात्र बिबटा नवीन जन्मला आलेल्या वासरांना एक तर जायबंदी करतो किंवा आपल्या भक्ष्यस्थानी घालतो.

यासबंधी वनखात्याकडे तक्रार करून बिबट्याला पकडण्यासाठी पांजरा लावण्याची मागणी केली असल्याचे खरात यांनी सांगितले. सोमवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात घुसून एका पाडसाला जायबंदी केले, मंगळवारी पुन्हा रात्री दीड वाजण्याच्या सुमारास गोठ्यात येऊन दुसऱ्या पाडसाला जायबंदी केले.

गोठ्यात बिबटा घुसल्यानंतर गुरांनी मोठमोठ्याने हंबरण्यास सुरूवात केल्यानंतर जाग येऊन बिबट्याला उसकावून लावले आतापर्यंत पांच दुभत्या गाईच्या पाडसांना बिबट्याने जायबंदी केल्याने गाई दूध देत नाहीत.मंगळवारी जायबंदी केलेल्या पाडसाच्या अंगावर बिबट्याचे तेरा दांताच्या जखमा असल्याचे खरात यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT