Leopard Rescue in Vellim Dainik Gomantak
गोवा

विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन रक्षकांकडून जीवदान

बिबट्याच्या वावरामुळे वेळ्ळी परिसरात घबराट पसरल्याचं चित्र

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : गोयचे भाट वेळ्ळी येथे विहिरीत बिबट्या पडल्याने एकच खळबळ उडाली होती. विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन रक्षकांनी सुखरूप बाहेर काढले आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडला. मात्र बिबट्याच्या वावरामुळे वेळ्ळी परिसरात घबराट पसरल्याचं चित्र आहे.

मडगावच्या वन खात्याला काल बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास बिबट्या विहिरीत पडल्याचा एक फोन आला. वन विभागाचे रेस्क्यू अधिकारी ज्युलिओ कार्दोज आणि बेंहाल आताव यांनी अन्य पथका बरोबर घटनास्थळी धाव घेतली. हा नर बिबटा मध्यम वयाचा होता. आणि पाण्यातून बाहेर येण्यास धडपडत होता.

वन रक्षकांनी विहिरीत दोरीने पिंजरा सोडला आणि मोठ्या प्रयत्नांनी विहिरीत पडलेल्या बिबट्याला त्या पिंजऱ्यात चढवले. यानंतर वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला बाहेर काढले. रात्री 10 वाजता सुरू झालेले हे ऑपरेशन पहाटे 3 वाजेपर्यंत चालू होते. नंतर त्या बिबट्याला जंगलात सोडून दिले. मात्र रात्रभर वेळ्ळी परिसरात बिबट्याच्या सुटकेचा थरार रंगला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT