तुये पंचायत क्षेत्रातील सोणये-पालये येथील जेनिफर डिसोझा यांच्या घराच्या गॅलरीत बसलेल्या कुत्र्यावर आज पहाटे साडेपाचच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. कुत्रा ओरडतो म्हणून जेनिफर बाहेर आल्या तेव्हा बिबट्याने कुत्र्याला तेथेच टाकून पळ काढला.
तशीच घटना कालही घडली. एल्सी डिसोझा यांच्या घराच्या गॅलरीत असलेल्या कुत्र्याचा बिबट्याने फडशा पाडला. ही घटना सलग दोन दिवस भरवस्तीत घडल्यामुळे नागरिक भयभीत झालेले आहे.
याबाबत बोलताना या महिलांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की, घरातील कर्तेसवरते लोक कामानिमित्त बाहेरगावी असल्यामुळे व घरात लहान मुलं असल्यामुळे बिबट्याची खूप भीती वाटते.
या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली. विकासाच्या नावावर डोंगरमाळरानावरील झाडे कापली जातात. त्यामुळे बिबटे लोकवस्तीत घुसत आहेत.
स्थानिक पंचसदस्य उदय मांजरेकर म्हणाले की, जंगली जनावरे रोज लोकवस्तीत येऊ लागली आहेत. पाळीव प्राण्यांबरोबरच आता माणसांचाही जीव धोक्यात आला आहे. मागच्या सहा वर्षांपासून तुये परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. त्याचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.