Goa News|Leopard Dainik Gomantak
गोवा

Goa News: नार्वे येथे बिबट्याच्या बछड्याची सुखरूप सुटका

वन खात्याकडून सुटका करण्यात आलेला दोन महिन्याचा आणि बछडा चुकून अडकला असावा, असा अंदाज आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: डिचोलीतील नार्वे गावात भर लोकवस्तीपासून जवळच अडकलेल्या बिबट्याच्या बछड्याची सुखरूप सुटका करण्यात आली असून, या बछड्याला वन खात्याने ताब्यात घेतले आहे. सुटका करण्यात आलेला दोन महिन्याचा आणि बछडा चुकून अडकला असावा, असा अंदाज आहे. भांबावलेला हा बछडा काहीसा कमजोर होता.

नार्वे येथील मर्मवाडा परिसरात एका चिरेखाणीच्या परिसरात बिबट्याचा बछडा अडकून पडल्याचे आज (शुक्रवारी) सायंकाळी निदर्शनास आले. लागलीच तेथील उल्हास पडोलकर यांनी ऍनिमल रेस्क्यू स्कॉडचे अमृत सिंग यांच्याशी संपर्क साधला. अमृत सिंग यांनी दुर्गेश सिंग आणि अक्षता सिंग यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली.

यासंबंधी केरी येथील क्षेत्रीय वन कार्यालयाला कळवताच वन खात्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. ॲनिमल रेस्क्यू स्कॉडच्या सहकार्याने बिबट्याच्या बछड्याला पकडल्यानंतर वन खात्याने त्याला ताब्यात घेतले.

दरम्यान, बछडा आढळल्याने नार्वे भागात बिबट्याचा संचार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. बिबट्याच्या बछड्याला ताब्यात घेतल्यानंतर डिचोलीतील डॉ.सिद्धी खांबल यांच्या पशुचिकित्सा दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आले. बछड्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT