Mulgaon Bicholim Viral Video Dainik Gomantak
गोवा

Leopard In Mulgao : लोकवस्‍तीत घुसून, कुत्र्याला घेऊन बिबट्याची धूम; मुळगावातील प्रकार

थरारक दृश्‍‍य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद; लोकांमध्ये घबराट

दैनिक गोमन्तक

Leopard Attacks Dog At Mulgao Bicholim : डिचोली शहराला लागून असलेल्या मुळगावात बिबट्याचा संचार वाढल्‍याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. लोकवस्‍तीपर्यंत पोहोचलेला हा बिबटा एका कुत्र्याचा फडशा पाडून त्‍याला घेऊन पलायन करीत असल्‍याचे दृश्‍‍य सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

मुळगाव गावालगत खाण आणि जंगल परिसर असल्याने रानटी श्‍‍वापदे असल्याची चर्चा असतानाच, एक बिबट्या श्री तळेश्वर देवस्थान परिसरात भरलोकवस्तीत संचार करीत आहे. त्‍यामुळे जनतेमध्ये घबराट पसरली आहे. या बिबट्याने मुळगावातील काही पाळीव प्राणी फस्त केल्याचा संशय आहे.

मुळगावातील ग्रामस्‍थ गौरेश परब यांचा एक पाळीव कुत्रा गायब झाल्यानंतर सीसीटीव्‍ही फुटेज पाहिली असता वरील संशय खरा ठरला. परब यांच्या घराजवळ मध्यरात्रीच्‍या सुमारास आलेला बिबट्या त्‍या कुत्र्याला घेऊन पलायन करीत असल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

मये, सर्वण भागातही संचार

भरलोकवस्तीत बिबट्या मुक्तपणे संचार करीत असल्यामुळे मुळगाववासीयांमध्ये घबराट पसरली आहे. मोठा अनर्थ घडण्यापूर्वीच वन खात्याने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी लोकांची मागणी आहे. तसे वन खात्याला कळविण्यातही आले आहे, असे सुजल परब यांनी सांगितले.

जंगले मोकळी झाल्याने रानटी प्राणी लोकवस्तीपर्यंत पोचले आहेत. मुळगावप्रमाणेच डिचोली शहराला लागून असलेल्या मये, सर्वण आदी भागातही बिबट्याचा संचार आहे, असे बोलले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT