'मी जीवन संपवतेय', मैत्रिणीला केला मेसेज; ऑफ ड्युटी पोलिसाने थिवीतील महिलेला असे दिले 'जीवदान'

पोलिस कॉन्स्टेबल रमेश उर्फ मुन्ना परब यांनी महत्वाची भूमिका बजावली
Pirna Ozarim bridge
Pirna Ozarim bridgeDainik Gomantak

Colvale Police Save life Of A Women On Pirna Ozarim Bridge : पिर्णा वझरी पुलावरुन एका 36 वर्षीय महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या थिवी येथील महिलेला कोलवाळ पोलिसांनी वाचवले. विशेष बाब म्हणजे ड्युटीवर नसतानाही पोलिस कॉन्स्टेबल रमेश उर्फ मुन्ना परब यांनी महत्वाची भूमिका बजावत त्या महिलेला आत्महत्या करण्यापासून रोखले.

Pirna Ozarim bridge
Pernem Accident News : पत्रादेवी येथे मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालवून मिनी बसला धडक; दोघे जखमी

याबाबत अधिक माहिती अशी की, "आयुष्याला कंटाळून आत्महत्या करण्यास निघाली" असल्याचा मॅसेज थिवी येथील एका 36 वर्षीय महिलेने आपल्या भावास तसेच मैत्रिणीस मोबाईलवरुन पाठवला. यानंतर तिच्या मैत्रीणीने तिला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर फोन स्वीच ऑफ आढळून आला. ती तिच्या दुचाकीने घरातून निघाली दोन मुलींना शाळेत सोडले. सध्या ती कुठे आहे माहिती नाही अशी तक्रार तिच्या मैत्रीणीने कोलवाळ पोलिसांत दिली.

तक्रारीच्या आधारे एसडीपीओ म्हापसा जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली कोलवाळ पोलिस स्थानकाचे पीआय पीएस विजय राणे, पीएसआय रोहन मडगावकर, पोलिस कॉन्स्टेबल रमेश परब, रामेश्वर, तौसिफ, एलपीसी शिल्पा शेटगावकर एचजी रितेश, अन्वी सावंत यांच्या टिमने रेल्वे ट्रॅक, हायवे रोड, नदीचा काठ अशा संभाव्य ठिकाणी पोलिसांनी शोध मोहिम राबवली.

Pirna Ozarim bridge
Pernem Accident News : पत्रादेवी येथे मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालवून मिनी बसला धडक; दोघे जखमी

तसेच व्हॉट्सअॅप ग्रुपवर महिला आणि वाहनाच्या डिटेल्स पाठवण्यात आल्या. ऑन ड्युटी आणि ऑफ ड्यूटी कर्मचारी देखील ऑपरेशनमध्ये सहभागी झाले. यावेळी ऑफ ड्यूटीवर असलेले पोलिस कॉन्स्टेबल रमेश उर्फ मुन्ना परब यांना पिर्णा वझरी पुलावर महिलेची दुचाकी आढळून आली.

पुलाच्या परिसरात महिला आढळून आली. कोलवाळ पोलिसांनी तक्रार दाखल होताच कार्यतत्परता दाखवत एक तासाच्या आत महिलेचा शोध घेण्यात यश आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com