Arambol Leopard Attack 
गोवा

Leopard Attack: हरमलमध्ये बिबट्याची दहशत! घराच्या पहिल्या मजल्यावर चढून कुत्र्याचा घेतला बळी; आमदारांच्या हस्तक्षेपानंतर वन खाते सक्रिय

Arambol Leopard Sighting: हरमल येथील वरचावाडा व नानोसकरवाडा परिसरात बिबट्याचा वाढता वावर आणि पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

हरमल येथील वरचावाडा व नानोसकरवाडा परिसरात बिबट्याचा वाढता वावर आणि पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वरचावाडा येथील उल्हास नाईक यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावर चढून बिबट्याने पाळीव कुत्र्याचा बळी घेतल्याची घटना घडल्यानंतर आमदार जीत आरोलकर यांनी वन खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. बिबट्याला तातडीने जेरबंद करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

शनिवारी मध्यरात्री दीडच्‍या सुमारास बिबट्याने उल्हास नाईक यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावर धाव घेत कुत्र्यावर झडप घातली. कुत्र्याचा बळी घेतल्यानंतर त्याने सुमारे आठ फूट उंचीवरून उडी मारून जवळच्या जंगलात धूम ठोकली. गेल्या सहा महिन्यांत या परिसरात चार कुत्रे व एका वासराचा बिबट्याने बळी घेतल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे बिबट्या मानवी वस्तीजवळ चटावल्याची भीती व्यक्त होत आहे.

बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे लहान मुलांना अंगणात खेळणेही धोकादायक ठरत असून, सायंकाळी चारनंतर परिसरात शुकशुकाट पसरत असल्याचे ग्रामस्थ शरद नाईक यांनी सांगितले. आमदार आरोलकर यांच्या हस्तक्षेपानंतर वन खात्याने हालचाली सुरू केल्या आहेत. वन खात्याचे अधिकारी हरीश महाले यांनी वर्तमानपत्रे व सोशल मीडियाद्वारे घटनेची माहिती मिळाल्यानंतर आवश्यक उपाययोजना सुरू केल्याचे सांगितले.

लेखी तक्रार मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावून सापळा रचण्याची तयारी वन खात्याने केली आहे.बिबट्याला वेळीच जेरबंद केले नाही तर मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे, अशी भीती नागरिक सदा नाईक यांनी व्यक्त केली.

पहिल्‍या मजल्‍यावर जाऊन कुत्र्याचा घेतला बळी

ग्रामस्थांनी दिलेल्‍या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांत बिबट्याने परिसरातील चार कुत्रे आणि एका वासराचा बळी घेतला आहे. त्यामुळे बिबट्याचा मानवी वस्तीत वाढता वावर हा चिंतेचा विषय बनला आहे. लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाल्याने बिबट्याला तातडीने पकडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT