Leopard Attack Dainik Gomantak
गोवा

Leopard Attack: ..रात्री समोर उभा राहिला बिबट्या! तांबडीसुर्लातील थरार; घरात घुसून केला मांजरावर हल्ला

Tambadi Surla Sacorda: बिबट्याचा डाव फसल्याने मांजर कसेबसे सुटून खुर्चीच्या खाली आले. बिबट्याच्या दिशेने खुर्ची भिरकावल्यानंतर बिबट्याने पळ काढला.

Sameer Panditrao

तांबडीसुर्ला: तांबडीसुर्ला-साकोर्डा येथील पत्रकार संतोष च्यारी यांच्या घरात घुसून बिबट्याने मंगळवारी (ता.६) रात्री ८.४५ वा. सुमारास मांजरावर अचानक प्राणघातक हल्ला केला. मात्र, बिबट्याच्या प्रयत्नाला यश आले नाही.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, संतोष च्यारी हे खुर्चीवर बसून निवांतपणे मोबाईलवर बातमी लिहिण्यात व्यस्त होते. समोर जवळच मांजर बसले होते. कोणाचाही गाजावाजा, गोंगाट नसल्याने वातावरण शांत असल्याचे बिबट्याने संधी साधून क्षणाचाही विलंब न करता मांजरावर झडप घातली.

बिबट्याचा डाव फसल्याने मांजर कसेबसे सुटून खुर्चीच्या खाली आले. त्यावेळी जीवाच्या आकांताने मोठ्याने आवाज करून संतोष च्यारी यांनी बिबट्याच्या दिशेने खुर्ची भिरकावल्यानंतर बिबट्याने पळ काढला.

प्रत्यक्ष बिबट्याला पुढ्यात दिसला आणि भीतीने थरकाप उडाला. सुदैवाने मी बचावलो. बिबट्याने रात्रीच्या वेळी घरात हल्ला केला, ही परिसरातील पहिलीच घटना आहे, अशी माहिती संतोष च्यारी यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT