Legal Metrology officials conduct a raid
Legal Metrology officials conduct a raid Dainik Gomantak
गोवा

Goa Saras Festival Raided: सरस प्रदर्शनावर वजन-माप खात्याने टाकला छापा

दैनिक गोमन्तक डिजिटल

Weights and Measures Department Raids Saras Festival: वजन व माप खात्याच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी मडगाव येथे भरलेल्या सरस प्रदर्शनावर छापा टाकून आवश्यक ती माहिती प्रदर्शित न केलेले मसाज मशीन आणि चॉपर जप्त केले.

या मालावर उत्पादक कंपनीचे नाव आणि पत्ता नव्हता. तसेच माल निकृष्ट दर्जाचा असल्यास त्याची तक्रार करण्यासाठी कस्टमर केअरचा क्रमांकही नमूद केलेला नव्हता, अशी माहिती वजन व माप खात्याचे निरीक्षक नितीन पुरुषन यांनी दिली.

यासंबंधी ‘गोवा कॅन’ संघटनेने तक्रार दिली होती. मडगाव येथे भरलेले हे प्रदर्शन स्वयंसेवी गटांना प्रोत्साहन देण्यासाठी भरवले जाते.

अशा प्रदर्शनात असा तकलादू माल विकणारी दुकाने येतात कशी, असा सवाल करून यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार करणार असल्याची माहिती ‘गोवा कॅन’चे रोलंड मार्टिन्स यांनी दिली.

सरस प्रदर्शनात विकला जाणारा माल ‘चायना मेड’ असल्याचा आरोपही त्यांनी केला. वजन व माप खात्याने बेकायदा वस्‍तूंच्‍या विक्रीवर कडक नजर ठेवली आहे.

राज्‍यात महिनाभरात काही महत्त्‍वाच्‍या आस्‍थापनांवर छापे टाकून लाखोंचा माल जप्‍त केला आहे. मोबाईल व इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्‍या वस्‍तू विकणाऱ्यांनीही आता कारवाईची धास्‍ती घेतली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Heat Wave : राज्यात उष्मा वाढला, घामोळ्याने जीव होतोय हैराण; काळजी घेण्याचे आवाहन

Mapusa News : रमाकांत खलप हे ‘बँक लुटारू’ ! मुख्‍यमंत्री

Valpoi News : पिसुर्ले पंचायत क्षेत्रात खाणी सुरू करण्याचा प्रयत्न : आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे

Panaji News : भाऊबीज समजून तुमच्या ‘भाई’ला मत द्या! ॲड. रमाकांत खलप

Margao News : रेल्‍वे मार्ग दुपदरीकरणास सुरावलीतून विरोध; बैठकीत एकमताने निर्णय

SCROLL FOR NEXT