मुरगाव पालिका इमारतीच्या छप्पराला गळती लागून शेकडो अर्ज पाण्यात

 

Dainik Gomantak

गोवा

मुरगाव पालिका इमारतीच्या छप्पराला गळती लागून शेकडो कोविड अर्ज पाण्यात

या अर्जांवर पावसाचे पाणी पडल्याने त्यांना सदर मदत मिळणे कठीण जाणार

दैनिक गोमन्तक

वास्को : महामारीवेळी उपेक्षित कामगारांनी कोविड 19 (Covid19) साहाय्य योजने अंतर्गत देण्यात येणारे पाच हजार रुपये मिळावेत यासाठी केलेल्या अर्जांबद्दल मुरगाव (Margao) पालिकेचा हलगर्जीपणा उघडकीस आला.

पालिका इमारतीच्या छप्पराला गळती लागून शेकडो अर्ज भिजल्याने खराब झाले आहेत. त्या अर्जाचा काहीच उपयोग होणार नसल्याने अर्जासाठी ना कामगारांनी केलेला चारशे ते पाचशे रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. याप्रकरणी तोडगा काढून संबंधितांना योजनेते पैसे देण्याची व्यवस्था करण्याची गरज कामगारांनी व्यक्त केली आहे.

उपेक्षित कामगारांना पाच हजार रुपयांचे साहाय्य देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यामुळे शेकड़ो लोकांनी सदर अर्ज पालिकेकडे सादर केले होते. सदर अर्जासोबत त्यांना शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र, आधार कार्ड व इतर कागदपत्रे सादर करावी लागली होती. या अर्जांवर पावसाचे पाणी पडल्याने त्यांना सदर मदत मिळणे कठीण जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुसळधार पावसाचा तडाखा! आके येथील गृहनिर्माण वसाहतीची संरक्षक भिंत कोसळली; परिसरात भीतीचं वातावरण

NSUI Law Students: 'कायदा'च्या विद्यार्थ्यांना न्याय द्या! 'एनएसयूआय'ची मागणी; कुलगुरूंकडून तोडगा काढण्याचे आश्‍वासन

Goa Tourist Safety: अभयारण्यातील धबधब्यांचे पर्यटकांना आकर्षण; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल, दंडासह अटकेचीही शक्यता

California Shooting: कॅलिफोर्नियात फिफा वर्ल्ड कप फॅन झोनजवळ गोळीबार! एकाचा जागीच मृत्यू; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Akshat Naik Death Case: 'अक्षत' मृत्यूप्रकरणी नव्याने तपास करा, वडिलांची पोलिसांत तक्रार, पुरावे लपविल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT