पणजी: गोव्यात पुन्हा एकदा कोरोनाचा(covid-19) नवा व्हेरिएंन्ट ओमिक्रॉनचा (omicron variant) संशयित आढळला आहे. तो 13 वर्षांचा असून मंगळवारी गोवा विमानतळावर (Goa Airport) यूकेहून (UK) आल्यावर कोविड पॉझीटिव्ह आढळला. आणि त्याच्या सोबतच्या इतर सर्व प्रवाशांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसांत कोविड पॉझिटिव्ह आढळून आलेला यूकेमधील हा चौथा प्रवासी असलेल्याचे आढळले आहे. त्याला सध्या शासकीय आरोग्य केंद्रात विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे.
चार रशियन आणि जॉर्जियन क्रू सदस्य ज्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग टेस्टचे रिपोर्ट नकारात्मक होते त्यांना आता विलगीकरणातून सोडण्यात आले आहे. नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे येथून एका क्रू मेंबरच्या जीनोम सिक्वेन्सिंग रिपोर्टची वाट पाहणे सुरू आहे.13 वर्षाच्या मुलासह गोव्यात आता पाच ओमिक्रॉन संशयित आढळले आहेत.
सोमवारी नवीन संसर्गामध्ये घट झाल्यानंतर, गोव्यात काल पुन्हा 44 नवीन कोविड प्रकरणे नोंदवली गेली ज्यामध्ये एकाचाही मृत्यू झाला नाही. 1 ऑक्टोबरपासून गोव्यातील संसर्गसख्या 100 च्या खाली राहिली आहेत. राज्यांत कोविड चाचणीचे प्रमाण वाढले आहे. गोव्याने सोमवारी 1,396 आणि मंगळवारी 2,886 नमुन्यांची चाचणी करण्यात आली केली. त्यापैकी सक्रिय प्रकरणांची संख्या 390 आहे. 7 ते 13 डिसेंबर दरम्यान उत्तर गोव्यासाठीचा जिल्हा सकारात्मकता दर 1.7% आणि दक्षिण गोव्यासाठी 1.3% होता.
ऑगस्ट 2020 ते जून 2021 या कालावधीत 9 डिसेंबर रोजी आरोग्य सेवांनी 94 जणांच्या मृत्यूची नोंद केली असली तरी गेल्या 10 दिवसांपासून दैनंदिन कोविड मृत्यूचे प्रमाण शून्य राहिले आहे. त्यापैकी एका व्यक्तीला मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि 43 जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय निवडला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.