Congress In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: 'युवा पिढीकडे नेतृत्व देणे ही स्वागतार्ह बाब'

दिगंबर कामत: लोबो आणि पाटकर यांनी मडगावात घेतली भेट

दैनिक गोमन्तक

मडगाव: काँग्रेस पक्षाने पक्ष कार्याची धुरा नवीन पिढीकडे दिली आहे ही स्वागतार्ह बाब आहे. मी या धोरणाचे स्वागतच करतो, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि मावळते विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी व्यक्त केली. आज काँग्रेसचे विधिमंडळ नेते मायकल लोबो आणि प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिगंबर कामत यांची मडगावात भेट घेऊन त्यांची केंद्रीय समितीवर नेमणूक झाल्याने त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

कामत यांच्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिले जात होते. मात्र, शेवटी त्यांना विरोधी पक्षनेतेपदही मिळाले नाही. या पार्श्वभूमीवर त्यांचे मत विचारले असता त्यांनी वरील उत्तर दिले.

दरम्यान, पत्रकारांशी बोलताना नवीन विधिमंडळ नेते मायकल लोबो यांनी आमच्या पुढील वाटचालीसाठी आम्हाला दिगंबर कामत यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद पाहिजे यासाठीच आम्ही इथे आलो आहोत, असे सांगितले.

आलेक्स सिक्वेरा यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना बदलून त्यांच्या जागी युरी आलेमाव यांना कार्याध्यक्षपदी नेमण्याचे कारण काय असे विचारले असता, सासष्टी हा काँग्रेसचा बालेकिल्ला असूनही काही कारणास्तव या तालुक्यात मतदार काँग्रेसपासून दूर गेले. युरी आलेमाव हे सासष्टीचा चेहरा असून ते मतदारांना काँग्रेसकडे आणणार ही आम्हाला खात्री आहे, असे लोबो म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT