UTAA Govind Gaude Support Dainik Gomantak
गोवा

Govind Gaude: गावडेंना हटविण्‍यासाठी षडयंत्र रचलंय, कारवाई करणारे ‘ते’ कोण? फर्मागुढीत 'उटा'चे शक्तिप्रदर्शन

Govind Gaude: आक्रमक भाषेत उटा संघटनेच्‍या व्‍यासपीठावरून मंत्री गावडे यांच्‍या समर्थनार्थ आज अनेक नेत्‍यांनी राज्‍य सरकारला थेट आव्‍हान दिले.

Sameer Panditrao

फोंडा: कला व संस्‍कृती मंत्री गोविंद गावडे यांना हटविण्‍यासाठी सरकारातील काहींनी षडयंत्र रचले आहे. सावंत यांना मुख्‍यमंत्री करण्‍यात गावडे यांचे मोठे योगदान आहे. त्‍यांच्‍यावर शिस्‍तभंगाच्‍या कारवाईचे संकेत देणारे ‘हे’ कोण, अशा आक्रमक भाषेत उटा संघटनेच्‍या व्‍यासपीठावरून मंत्री गावडे यांच्‍या समर्थनार्थ आज अनेक नेत्‍यांनी राज्‍य सरकारला थेट आव्‍हान दिले.

‘आदिवासी कल्‍याण खात्‍यामध्‍ये भ्रष्‍टाचार चालतो’, अशा आशयाचे वक्‍तव्‍य केल्‍याने मंत्री गावडे यांना हटविण्‍याच्‍या हालचाली अंतिम टप्‍प्‍यात पोहोचल्‍या आहेत. त्‍या पार्श्वभूमीवर आज फर्मागुढी - फोंडा येथील गोपाळ गणपती सभागृहात उटा संघटनेची जाहीर सभा झाली.

सभेचे आयत्‍यावेळी आयोजन करूनही अल्‍प वेळेत संघटनेच्‍या शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्‍थित राहात गावडेंना प्रबळ पाठिंबा असल्‍याचे दाखवून दिले. गावडे यांना हटविल्‍यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा अप्रत्‍यक्ष इशारा सभेतील वक्‍त्‍यांनी सरकारला दिला.

भाजपसाठी गावडे यांचे अतुलनीय योगदान असल्‍याचे नेत्‍यांनी भाषणातून उद्घृत केले. व्यासपीठावर माजी मंत्री प्रकाश वेळीप, उटाचे पदाधिकारी विश्वास गावडे, डॉ. उदय गावकर, दुर्गादास गावडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. विश्वास गावडे म्हणाले, गोविंद यांचे पाय ओढण्याचा प्रयत्न काही राजकीय नेत्यांकडून केला जात आहे. सावंत यांना मुख्‍यमंत्री करण्‍यात गोविंद यांचा मोठा हात आहे, अशा शब्‍दांत त्‍यांनी ऋण विसरू नका, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली.

गावडे खरेच बोलले; प्रकाश वेळीपांचा दावा

‘आदिवासी समाजाचा बुलंद आवाज असलेल्या ‘उटा’ संघटनेच्या व्यासपीठावरून मंत्री गावडे खरेच बोलले. त्‍यामुळे सरकारने कोणताही निर्णय घेऊ दे; तो सत्याच्या बाजूनेच असावा, हा उटाचा आग्रह असल्याचे प्रकाश वेळीप यांनी ठामपणे सांगितले.

गावडे यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. भाषणातील पाच सेकंदांचा भाग प्रसारित करून माध्यमांवर ‘डिबेट’ काय घेतली जाते! सारेच अनाकलनीय आहे. समाजाच्या हितासाठी काही बोलायचे नाही काय? असेही ते म्‍हणाले.

बहुजन समाजाचा पूर्ण पाठिंबा : युगांक नाईक

युगांक नाईक यांनी मंत्री गावडे यांना भक्‍कम पाठिंबा व्‍यक्‍त केला. ते म्‍हणाले, उटामुळे सर्वसामान्यांना न्याय मिळाला आहे. आदिवासी हा समाज नसून ती गोमंतकाची संस्कृती आहे. ही संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्‍न सध्‍या सुरू आहे.

‘उटा’ने आक्रमकता कायम ठेवावी. मंत्री गावडेंनी आदिवासींच्‍या मागण्‍यांसाठी ६३ दिवस कैद भोगली आहे. गावडे यांच्यासोबत बहुजन समाज आहे, हे विसरू नका. गावडे यांच्‍यावर शिस्‍तभंगाची कारवाई करणारे ‘हे’ कोण, असा सवाल करत युगांक यांनी अप्रत्‍यक्षरीत्‍या भाजपला सुनावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rain Dogs Exhibition: गोव्यात रविवारी 'रेन डॉग्स' प्रदर्शनाचं आयोजन, छायाचित्रांतून पाहता येणार 'भटक्या कुत्र्यांचे' वास्तव

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा 'व्होट चोरी'चा आरोप

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

बेकायदेशीर! PFI सोबत लिंक असल्याच्या संशयावरुन गोव्यातील उद्योगपतीच्या अटकेबाबत हायकोर्ट काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT