Mumbai Goa Highway Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Highway: ठाकरे गटातील नेत्याच्या हत्येचा प्रयत्न, आमदाराच्या मुलावर आरोप; मुंबई-गोवा महामार्गावरील घटना

Mumbai Goa Highway: आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी हा हल्ला केल्याचा आरोप अनिल नवगणे यांनी केला आहे.

Pramod Yadav

Mumbai Goa Highway

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यावर दगडफेक झाल्याची घटना रायगड येथून समोर आलीय. ठाकरे गटाचे दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. मुंबई-गोवा महामार्गावर वीर येथे नवगणे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला.

याप्रकरणी विकास गोगावले यांच्यासह तीस जणांवर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची महाड येथे जाहीर सभा होती. या सभेला नवगणे यांनी हजेरी लावली होती. नवगणे सभा आटोपून इंदापूर येथील आपल्या घरी जात असताना, रात्री उशीरा त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला.

वाहन चालकांने प्रसंगावधान दाखवल्यामुळे गाडीतील सर्वजण सुखरुप असल्याची माहिती आहे. आमदार भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले यांच्या चिथावणीवरुन हा हल्ला झाला आणि हल्ला झाला त्यावेळी विकास तिथेच हजर होता, असा आरोप नवगणे यांनी केला आहे.

अनिल नवगणे यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी याप्रकरणी माणगाव पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आलीय. नवगणे आणि गोगावले यांच्या मागील दोन ते तीन वर्षापासून वाद असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, त्याला अलिकडे राजकीय किनार देखील प्राप्त झालीय.

या हल्लात नवगणे यांच्या वाहनाचा चालक किरकोळ जखमी झाला असून, वाहनातील इतर सर्वजण सुखरुप आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: ‘अटल सेतू’खाली आढळला कुजलेला मृतदेह! अनोळखी फोनवरून मिळाली माहिती; मृत मणिपूरचा रहिवासी

Marathi Official Language: 'राजभाषेचा दर्जा द्या अन् वाद मिटवा'! मराठीप्रेमींचे आवाहन; मुख्यमंत्री निवासापुढे आंदोलनाचा दिला इशारा

गोव्यातील चिकन, मटण दुकाने ‘प्रदूषण नियंत्रण’च्या रडारवर! पाळावे लागणार कठोर निकष; नियमित तपासणी, अहवाल सादर करणे बंधनकारक

Sand Mining: 'रेती परवाने का अडकलेत'? धक्कादायक माहिती उघड; पर्यावरण दाखल्यातील अटीचाही घोळ

Goa Rain: ऑक्टोबरमध्ये 'रेकॉर्डब्रेक' पाऊस! 121% जास्त कोसळला; अजूनही तुरळक सरींची शक्यता

SCROLL FOR NEXT