Chief Minister Prof. Laxmikant Parsekar Dainik Gomantak
गोवा

Pernem : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार राहणार चिरंतर ; लक्ष्मीकांत पार्सेकर

प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर : पेडणे तालुका नागरिक समितीतर्फे आंबेडकर १३२ वी जयंती उत्साहात

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील दुर्बल घटकांसाठी जे योगदान दिले आणि उद्बोधक प्रेरणादायी विचार दिले ते चिरंतर राहतील. डाॕ. बाबासाहेब हे भारताचेच नव्हे, तर जागतिक पातळीवरचे महान बुद्धिमत्ता असलेले नेते होते, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पेडणे येथे पेडणे तालुका नागरिक समितीने आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर खास निमंत्रित पाहुणे म्हणून मिशन फाॕर लोकलचे राजन कोरगावकर, हरमल जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशांवकर, मोरजी जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर, साहित्यिक उल्हास आरोलकर, पेडणे तालुका नागरिक समितीचे अध्यक्ष भारत बागकर, भगवती हायस्कूल पेठेचावाडाचे मुख्याध्यापक राघोबा कांबळी, कमळेश्वर हायस्कूलचे मुख्याध्यापक आत्माजी नाईक, राजन घाटे आदी उपस्थित होते.

प्रा. पार्सेकर पुढे म्हणाले, की देशात अनेक गोष्टी भारत स्वातंत्र्यानंतर घडल्या. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मागासलेला कष्टकरी दीन दुबळा समाज होता त्या समाजाला उच्चस्तरावर नेण्यासाठी आणि त्या समाजाची दुःखे समजून घेऊन ती दूर करण्यासाठी दूरदृष्टीने देशाला एक महान घटना दिली. बाबासाहेब यांचे कार्यअलौकिक आहे.

यावेळी डाॕ. आंबेडकरांच्या प्रतिज्ञांची वाचन स्पर्धा घेण्यात आली. त्याचा निकाल पुढीलप्रमाणे - विद्यार्थी गट ः प्रथम - दर्शिल वायंगणकर, द्वितीय - रुपेश नाईक, मोठा गट ः प्रथम - सदानंद वायंगणकर, द्वितीय - महेश वायंगणकर, तृतीय - महादेव पटेकर, उत्तेजनार्थ - सखाराम पेडणेकर, विवेक गावकर, सुजय मळीक, भारत बागकर. स्पर्धेचे परीक्षक डाॕ. नामदेव चोपडेकर, दयानंद मांद्रेकर व आत्माजी नाईक यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT