Lavoo Mamledar Dainik Gomantak
गोवा

Lavoo Mamledar Death Case: लवू मामलेदार यांचा अंतिम शवचिकित्सा अहवाल रखडला, चार्जशीट प्रलंबित

Goa Ex-MLA Lavoo Mamledar Death Case: गेल्या १५ फेब्रुवारीला लवू मामलेदार यांच्यावर बेळगाव येथे एका छोट्याशा अपघातप्रकरणी एका माथेफिरूने हल्ला केला होता.

Sameer Panditrao

फोंडा: फोंड्याचे माजी आमदार तथा माजी पोलिस उपअधीक्षक लवू मामलेदार यांच्या बेळगावातील मृत्यूप्रकरणाचा तपास बेळगाव पोलिस करीत आहेत, या मृत्यू प्रकरणातील शवचिकित्सेसह व्हिसेरा अहवाल आला असला तरी अंतिम शवचिकित्सा अहवाल अजून येणे बाकी आहे, त्यानंतरच मग पोलिस चार्जशीट दाखल करतील, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, लवू मामलेदारांच्या आकस्मिक मृत्यूनंतर त्यांचे कुटुंबीय अजून सावरलेले नाही.

गेल्या १५ फेब्रुवारीला लवू मामलेदार यांच्यावर बेळगाव येथे एका छोट्याशा अपघातप्रकरणी एका माथेफिरूने हल्ला केला होता, त्यानंतर लगेच लवू मामलेदार कोसळले आणि मरण पावले होते. याप्रकरणी बेळगाव पोलिसांनी संशयितावर गुन्हा दाखल केला असून शवचिकित्सेचा दुसरा अहवाल अजून यायचा असल्याने चार्जशीट मात्र दाखल करण्यात आलेले नाही.

लवू मामलेदार हे तसे शारीरिकदृष्ट्या ‘फीट' होते, आणि बेळगावातील हल्ल्याच्या आठ दिवसांपूर्वी त्यांनी आपले पूर्ण ‘चेकअप' करून घेतले होते. लवू मामलेदार हे स्वतः पोलिस खात्यातील असल्याने ते आपल्या आरोग्याबद्दल सजग होते. मात्र एखाद्या व्यक्तीने वार केल्यानंतर साठीनंतरच्या वयातील व्यक्तीला ह्रदयविकाराचा झटका येणे शक्य आहे,अशीही शक्यता व्यक्त करण्यात येत असल्याने हा ‘सेकंड ओपिनयन’ महत्त्वाचा आहे.

अहवाल आठ दिवसांत शक्य

लवू मामलेदार यांचा व्हिसेरा अहवाल आला आहे, मात्र त्यात कोणताही आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. शवचिकित्सेच्या पहिल्या अहवालात लवू मामलेदार यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे नमूद करण्यात आले आहे, मात्र याच अहवालातील ‘सेकंड ओपिनियन’ असणारा दुसरा अहवाल अजून प्रतीक्षेत आहे. हा अहवाल येत्या आठ दहा दिवसात मिळण्याची शक्यता असल्याची माहिती लवू मामलेदार यांच्या कुटुंबीयांनी दिली, त्यानंतरच पोलिसांकडून चार्जशीट दाखल केले जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT