Launch of St Francis Xavier Fest Novena in Goa  Dainik Gomantak
गोवा

जुने गोव्यात सेंट फ्रान्सिस झेव्हीयर फेस्ताच्या नोव्हेनांना प्रारंभ

नोव्हेना आणि फेस्त्त साजरे होणार ही बातमी संपुर्ण गोवाभर पसरल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले

दैनिक गोमन्तक

गोवा वेल्हा: संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेले जुने गोवे (old goa) येथील गोंयच्या सायबाच्या अर्थात सेंट झेव्हीयरच्या नऊ दिवसांच्या प्रार्थना सभांना 24 नोव्हेंबर पासून उत्साहात प्रारंभ झाला. हा फेस्त्त 3 डिसेंबरला मुख्य फेस्त उत्साहात संपन्न होणार आहे. फेस्ताची (Fest novena) तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Launch of St Francis Xavier Fest Novena in Goa)

कोविड 19 मुळे गेल्या दोन वर्षांत भाविकांना सायबाच्या नोव्हेना आणि फेस्त्ताचा आनंद लुटता आला नव्हता. आता परिस्थिती बरीच नियंत्रणाखाली असल्याने यंदा नोव्हेना आणि सायबाचे फेस्त्त साजरे करण्याचा निर्णय चर्चने घेतला होता. या अनुषंगाने हालचाली चालू होत्या. उपलब्ध माहितीनुसार नोव्हेना आणि फेस्त्त साजरे होणार ही बातमी संपुर्ण गोवाभर पसरल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

अखेर चर्चच्या नियोजित कार्यक्रमानुसार 24 नोव्हेंबर रोजी सेंट फ्रान्सिस झेव्हीयर फेस्त्ताच्या पहिली नोव्हेना प्रार्थनासभा संपन्न झाली. उर्वरित प्रार्थनासभा डिसेंबरपर्यंत सकाळ संध्याकाळ नियोजित वेळेत चालणार आहेत. दरम्यान आज रविवार असल्याने दिवसभराच्या सर्व प्रार्थना सभांना गर्दी होती. उर्वरीत प्रार्थनासभांना भाविक गर्दी करणार आहेत. पिलार ते जुने गोवे रस्त्यावर ताण पडल्याचे दिसून येत होते.

दरम्यान 3 डिसेंबर रोजी पहाटे पासूनच सायबाच्या फेस्ताला प्रारंभ होणार आहे. सकाळ संध्याकाळी चर्चच्या प्रांगणात उभारलेल्या मंडपात दिवसभराच्या प्रार्थनासभा होणार आहे. मुख्य प्रार्थना सभा सकाळी 10 वाजता होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'कुशावती' जिल्ह्याचा उदय! जिल्हा मुख्यालयाचा मान मिळाल्याने केपेवासियांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

विदेशी माणसांप्रमाणेच विदेशी झाडेही आक्रमक! आपली जैवविविधता वाचवण्यासाठी 'देशी' वृक्षांची गरज

VIDEO: अर्शदीप सिंगच्या रन-अपची विराटनं उडवली खिल्ली! रोहितलाही हसू आवरले नाही; सराव सत्रातील व्हिडीओ व्हायरल

Gauri Achari Murder Case: गौरी आचारी खून प्रकरण! गौरव बिद्रेचा चौथ्यांदा जामीन अर्ज फेटाळला, विलंब होतो म्हणून जामीन मिळणार नाही

Goa Politics: खरी कुजबुज; भाजप खासदार काँग्रेस नेते?

SCROLL FOR NEXT