Mumbai Goa Highway Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Highway: टोल, टनल आणि बरचं काही! मुंबई-गोवा महामार्गावर काय काय असणार?

या महामार्गावर अनेक सुविधा दिल्या जातील, ज्यामुळे हा महामार्ग अधिक अधुनिक असेल.

Pramod Yadav

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 चे सध्या जोमात काम सुरू आहे. लवकरच हा महामार्ग खुला होईल असे सांगितले जात आहे. या महामार्गावर अनेक सुविधा दिल्या जातील, ज्यामुळे हा महामार्ग अधिक अधुनिक असेल. जानेवारी 2024 मध्ये सुरू होणाऱ्या या हायवेमध्ये काय खास आहे ते जाणून घेऊया?

वेळेचे होईल बचत

अनेक दिवसांपासून रखडलेला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग लवकरच पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान, हा महामार्ग पूर्ण झाल्यावर वेळेचे बचत होईल. महामार्ग पूर्ण झाल्यावर मुंबई ते गोवा हा प्रवास साडेचार तासांत पूर्ण करता येईल.

मुंबई आणि गोवा दरम्यानचे अंतर सुमारे 600 किमी आहे आणि सध्या राष्ट्रीय महामार्ग 48 वरून दोन ठिकाणांदरम्यान वाहन चालविण्यासाठी सुमारे 11 तास लागतात.

दहा विभागात होत आहे काम

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 चे काम 10 टप्प्यात केले जात आहे. यातील दोन टप्प्यांचे काम सध्या सुरू आहे. डिसेंबरपर्यंत हा संपूर्ण भाग वाहतुकीसाठी उपलब्ध होईल आणि मुंबई ते गोवा प्रवासाचा वेळ साडेचार तासांनी कमी होईल.

टोल

मुंबई-गोवा महामार्ग सुरू झाल्यानंतर वाहनांकडून टोल आकारला जाईल. गडकरींनी मात्र टोल कधी वसूल केला जाईल याची कोणतीही माहिती दिली नाही. नियमानुसार रस्त्याचे 75 टक्के काम पूर्ण झाल्यास टोल वसूल केला जातो.

महामार्गावर दोन बोगदे बांधण्यात येणार

मुंबई-गोवा महामार्गावर दोन बोगदेही तयार केले जात असून, ते पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण केले जाणार आहेत. पावसाळ्यापूर्वी बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. उर्वरित बोगद्याचे बांधकाम या वर्षी ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल.

पर्यटकांची संख्या वाढणार

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 हा कोकण विभागातील 66 विविध पर्यटन स्थळांमधून जाणार असून, यातून राज्यालाही मोठा महसूल मिळणे अपेक्षित आहे. याशिवाय कोकण आणि गोव्यात येणाऱ्या पर्यचकांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT